शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रितेश देशमुख, रवी जाधव यांचं रायगडावरील मेघडंबरीत फोटो सेशन; शिवभक्त संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 11:32 IST

सोशल मीडियावर शिवभक्तांनी व्यक्त केला संताप

रायगड: अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासह पानीपतकार विश्वास पाटील यांनी थेट रायगडावरील मेघडंबरीत फोटो सेशन केल्यानं सामान्य शिवभक्त संतापले आहेत. सामान्य शिवभक्तांना सुरक्षेच्या कारणास्तव सिंहासनाजवळ जाऊ दिलं जात नाही. मग रितेश देशमुख, रवी जाधव सिंहासनावर जाऊन फोटोशूट कसं करतात, असा प्रश्न शिवभक्तांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेचा निषेध करणारे मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. गेल्या वर्षी रायगडावरील सिंहासनावर आरुढ असलेल्या शिवरायांच्या हातातील तलवार तुटलेल्या स्थितीत आढळून आली होती. तेव्हापासून मेघडंबरीकडे जाणाऱ्या पायाऱ्यांजवळच बॅरेकेड्स लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्य शिवभक्त पायऱ्यांजवळूनच शिवरायांना वंदन करतात. राज्याभिषेक सोहळ्यादिवशी शिवभक्तांना चौथऱ्यावर जाण्याची परवानगी असते. त्याहीवेळी कोणालाही मेघडंबरीत जाता येत नाही. शिवभक्त स्वत:हून ही मर्यादा पाळतात. मात्र अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रवी जाधव थेट मेघडंबरीत गेल्यानं शिवभक्तांनी संताप व्यक्त केला आहे. श्री शिवराजाभिषेक सोहळा ज्या ठिकाणी पार पडला, ते ठिकाण अतिशय महत्त्वाचं आणि पवित्र आहे. त्यामुळे या ठिकाणी जाताना काही गोष्टींचं भान राखणं गरजेचं असतं. मात्र रवी जाधव आणि रितेश देशमुख यांनी ते पाळलं नाही, असं श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे (दुर्गराज रायगड) कार्याध्यक्ष सनी ताठेले यांनी 'लोकमत'शी बोलताना म्हटलं. 'महाराजांना मुजरा करताना काही शिष्टाचार पाळणं गरजेचं आहे. सामान्य शिवभक्त मुजरा करताना दहा हात लांब राहतात,' असं ताठेले म्हणाले. सनी ताठेले यांनी रायगडावरील सुरक्षेबद्दलदेखील प्रश्न उपस्थित केले. 'राज्याभिषेकाव्यतिरिक्त इतर सर्व दिवशी शिवभक्त साधारणत: 15 मीटर लांब राहून महाराजांना अभिवादन करतात. मेघडंबरीकडे जाणाऱ्या पायऱ्यांजवळच बॅरिकेड्स लावलेल्या असतात. याशिवाय तिकडे सुरक्षारक्षकही तैनात असतात. रवी जाधव, रितेश देशमुख मेघडंबरीत गेले, तेव्हा सुरक्षा रक्षक कुठे होते?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 'एकवेळ रवी जाधव, रितेश देशमुख यांना प्रोटोकॉल माहित नसतील. पण त्यांच्यासोबत असलेल्या पानीपतकार विश्वास पाटील यांना मेघडंबरीचं पावित्र्य आणि तिथल्या शिष्टचारांची कल्पना नाही का?' असाही प्रश्न त्यांनी विचारला.  

टॅग्स :Ritesh Deshmukhरितेश देशमुखShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRaigadरायगडRavi Jadhavरवी जाधवTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया