शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

आता निष्काळजीपणे पोस्ट फॉरवर्ड करणे ठरेल संकटाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 5:12 AM

सोशल मीडियावर एखादी पोस्ट फॉरवर्ड केली आणि ती वादग्रस्त असली तर आता खैर नाही. ती पोस्ट वाचलीच नव्हती, वादग्रस्त असल्याचे लक्षात आल्यानंतर ती लगेच डिलीट केली, पोस्ट फॉरवर्ड केली तरी त्यातील मजकुराशी सहमत नाही, अशी कोणतीही सबब ऐकून न घेता तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकता.

- डॉ. खुशालचंद बाहेतीमुंबई  - सोशल मीडियावर एखादी पोस्ट फॉरवर्ड केली आणि ती वादग्रस्त असली तर आता खैर नाही. ती पोस्ट वाचलीच नव्हती, वादग्रस्त असल्याचे लक्षात आल्यानंतर ती लगेच डिलीट केली, पोस्ट फॉरवर्ड केली तरी त्यातील मजकुराशी सहमत नाही, अशी कोणतीही सबब ऐकून न घेता तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकता. पंतप्रधानांचे मॉर्फ केलेले फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केल्याबद्दल बंगळुरू पोलिसांनी गु्रप अ‍ॅडमिनसह फोटो पाठविणाऱ्यास अटक केली होती.वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाºयांनी स्थानिक अधिकारात खोटे व अफवा पसरवणारे संदेश पाठवल्यास तो गुन्हा होईल, असे आदेश काढले होते. या व अन्य प्रकरणांत कोर्टाने दिलेला निकाल पाहता यापुढे कोणतीही पोस्ट सजगपणे फॉरवर्ड करावी लागेल, असे दिसते. देशातील २६ कोटी ९० लक्ष शहरी आणि १६ कोटी ३० लक्ष ग्रामीण भागातील लोक इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. यापैकी बहुतेक जणांचा कौल हा आलेले मेसेजेस किंवा पोस्ट न वाचता फॉरवर्ड किंवा शेअर करण्याकडे असतो. मात्र, निष्काळजीपणाने किंवा अजाणतेपणाने आक्षेपार्ह पोस्ट पाठवणे अडचणीचे ठरू शकते.केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच देशातील सर्व जिल्ह्यांत सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोशल मीडियावरून येणाºया पोस्ट फॉरवर्ड करणाºयांसाठी ही धोक्याची घंटाच आहे. पोस्ट चुकून टाकली, अजाणतेपणी फॉरवर्ड केली, आक्षेपार्ह असल्याचे लक्षात येताच काढून टाकली, तरीही आपण अडचणीत येऊ शकता. माहिती तंत्रज्ञान कायद्यात पूर्वी आक्षेपार्ह साहित्य इंटरनेटवरून प्रसारित करणे हा कलम ६६अ प्रमाणे गुन्हा होता. सर्वोच्च न्यायालयाने हे कलम अभिव्यक्ती स्वातंत्र्यास बाधा आणते म्हणून रद्द केले. तरीही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास इतर कायद्याप्रमाणे कारवाई होऊ शकतेच. म्हणून पोस्ट विचारपूर्वक फॉरवर्ड करणे हेच योग्य ठरणार आहे.१ दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाप्रमाणे अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीबद्दल फेसबुकवरून अपमानास्पद लिखाण करणे अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा होतो. या कायद्याप्रमाणे गुन्हा होण्यासाठी अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीस सार्वजनिक दृष्टिपथात अपमानास्पद बोलणे आवश्यक असते. दिल्ली उच्च न्यायालयाने फेसबुक वॉलवरील लिखाण अनेकांना वाचता येते. त्यामुळे फेसबुक वॉल हे सार्वजनिक दृष्टिपथातील ठिकाण आहे, असे मत व्यक्त केले आहे.२ भाजपचे तामिळनाडूचे एक नेते एस. व्ही. शेखर यांनी एका महिला पत्रकाराबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. महिला पत्रकाराच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात एस. व्ही. शेखर यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला. त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला. यामध्ये त्यांनी आपल्याला आलेली पोस्ट आपण न वाचताच फॉरवर्ड केली होती आणि ती काढूनही टाकली होती. त्यामुळे त्यांचा यात कोणताही हेतू नव्हता असा मुद्दा मांडला. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने पोस्ट फॉरवर्ड करणे म्हणजे त्यातील मजकुराशी सहमती दर्शविणे किंवा ते मान्य करणेच आहे. पोस्ट काढून टाकली तरी गुन्हा घडलेलाच आहे, असे मत व्यक्त करून त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतरही त्यांना अटकपूर्व जामीन मिळालाच नाही.३ पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबद्दल अवमानजनक पोस्ट फेसबुक वॉलवर लिहिल्याबद्दल एका वकिलास न्यायालय अवमान कायद्याप्रमाणे दोषी ठरवून १ महिन्याची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातही दोषी वकिलांनी अवमानाबद्दल नोटीस मिळताच आपण ती पोस्ट काढून टाकली असे नमूद केले. मात्र, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांची शिक्षा कमी केली नाही.४ २०१६ मध्ये बब्बर खालसा संघटनेचा कार्यकर्ता अरविंदरसिंग यांना सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा प्रयत्न केल्याच्या आणि यासाठी लोकांना एकत्र केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. त्यांनी खलिस्तानच्या निर्मितीसाठी लोकांना चिथावणी देणाºया पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध चालू असलेल्या खटल्यात त्यांनी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.या अर्जात त्यांनी पोस्ट लिहिणे म्हणजे लोकांना एकत्र करणे असे होत नाही आणि त्यांच्या पोस्टमुळे कोणताही हिंसाचार झालेला नाही. त्यामुळे देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा होत नाही, असे म्हणणे मांडले होते. फेसबुकवरून पोस्ट टाकल्याने ती जगभरातील लोकांना दिसते. त्यामुळे चिथावणीखोर पोस्ट टाकणे म्हणजे लोकांना एकत्र करणेच होते, असे मत जामीन फेटाळताना न्या. सुदीप अहलुवालिया यांनी व्यक्त केले. प्रत्यक्षात लोक एकत्र आले नसले तरीही या पोस्टवरील लोकांचा प्रतिसाद पाहता लोक एकत्र आले असाच याचा अर्थ होतो, असे नमूद करून जामीन अर्ज फेटाळला.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकWhatsAppव्हॉट्सअॅप