शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून कलाकार उभे करतो, अजित दादांचा निशाणा; ...तर लपूनछपून भेटण्याचे कारण काय? कोल्हेंचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 12:34 IST

"खासगीत झालेल्या गोष्टी जाहीर न करण्याचा राजकारणातील अलिखित नियम मी नेहमीच पाळला आहे. परंतु, तुम्ही वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत आरोप करत असाल तर मी नम्रपणे काही प्रश्न विचारू इच्छितो."

मुंबई: आम्हाला उमेदवार भेटला नाही की आम्ही कलाकाराला उभे करतो, अमोल कोल्हे त्यापैकीच एक. राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमामालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चन हेही निवडून आले. मग त्यांनी राजीनामा दिला. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमचीही चूक आहेच. आपल्या विचारांचा खासदार निवडून दिला तर कामे व्हायला मदत होणार आहे. विरोधी पक्षाचा खासदार निवडला की नुसता तलवार काढतो आणि लढत बसतो. तेही नाट्यप्रयोगातून, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंवर टीकास्त्र सोडले. शिरूर मतदासंघात ते सोमवारी आयोजित सभेत बोलत होते. 

मागच्या वेळी मीच अमोल कोल्हे यांच्यासाठी मत मागायला तुमच्याकडे आलो होतो. त्यांचे वक्तृत्व चांगले होते. दिसायला राजबिंडा आहे. त्यावेळी मी सांगितले म्हणून तुम्ही कोल्हेंना निवडून दिले. पण तो बाबा काही दिवसांनी राजीनामा द्यायचा म्हणत होता. मुळात कोल्हे यांचा राजकारण हा पिंडच नाही, असे अजित पवार म्हणाले. 

१० वेळा निरोप, लपूनछपून भेटण्याचे कारण काय? -खासगीत झालेल्या गोष्टी जाहीर न करण्याचा राजकारणातील अलिखित नियम मी नेहमीच पाळला आहे. परंतु, तुम्ही वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत आरोप करत असाल तर मी नम्रपणे काही प्रश्न विचारू इच्छितो. माझ्यासारखा सेलिब्रिटी उमेदवार देणे चूक असेल तर १०-१० वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्याला तुमच्या पक्षात येण्याचा निरोप पाठवण्याचे कारण काय? लपूनछपून भेटण्याचे कारण काय? अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. माझ्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडताना मला तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचेही ते म्हणाले.

अजित पवार सातत्याने दावा करत आहेत की, मी त्यांना राजीनामा देण्याबद्दल बोललो होतो. परंतु, या काळात मी संसदेत कधी अनुपस्थित होतो का? तुमच्या पक्षाचे सुनील तटकरे यांच्या संसदीय कामगिरीपेक्षा तुम्ही ज्याला सेलिब्रिटी म्हणून हिणवता त्या अमोल कोल्हेची कामगिरी कायमच उजवी राहिली आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण