पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा साडी नेसवलेला फोटो व्हायरल केल्यामुळे संतापलेल्या भाजपाच्या कल्याण-डोंबिवलीमधील कार्यकर्त्यांनी हा फोटो व्हायरल करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश पगारे यांना भर चौकात गाठून भरजरी शालू नेसवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार काँग्रेसचे कल्याण-डोंबिवलीतील ज्येष्ठ नेते प्रकाश पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसवलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल झाला होता. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती.
यादरम्यान, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश पगारे यांना आज मानपाडा परिसरात गाठले. त्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पगारे यांना पकडून त्यांना भरजरी साडी नेसवली. तसेच नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो शेअर केल्या प्रकरणी पगारे यांचा निषेध केला. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्याने त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.