शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

अंगावरून साप गेला आणि मी मुख्यमंत्री झालो, शरद पवारांनी सांगितली दिलखुलास आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 17:09 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित समारंभात शरद पवार यांनी त्यांचा मुख्यमंत्री बनण्याबाबतचा एक किस्सा सांगितला. हा किस्सा सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित समारंभात शरद पवार यांनी त्यांचा मुख्यमंत्री बनण्याबाबतचा एक किस्सा सांगितला. हा किस्सा सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.काय म्हणाले शरद पवार -दिलीप वळसे पाटील यांचे वडील दत्तात्रय वळसे-पाटील यांच्यासोबत एकदा भीमाशंकरला गेलो होतो. तेव्हा मी राज्याचा उद्योगमंत्री होतो. एका खोलीत आमची राहण्याची सोय होती. रात्री एकच्या सुमारास मला थोडी हालचाल जाणवली म्हणून उठून बसलो तर माझ्या अंगावरून एक साप सरपटत खिडकीतून बाहेर जाताना दिसला.  या प्रकारामुळे मी सुन्न झालो आणि दत्तात्रय पाटील यांना हाक मारली.   दत्तात्रय पाटील यांना घडलेला सर्व प्रकार मी सांगितला तर त्यांना आनंद झाला. हा शुभशकुन आहे , आपण पहाटे पूजा करूया असं ते म्हणाले. त्यांचा सल्ला ऐकून मी पूजा केली आणि आम्ही दोघेही मुंबईला परतलो. त्याच दिवशी विधानसभेत अशा काही घडामोडी घडल्या की मी पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आठ दिवसांत मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच झालो, असं पवार म्हणाले.  दिलीप वळसे-पाटील यांच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तो शुभशकुन मी त्यावेळी अनुभवला. त्यानंतर माझी पत्नी सातत्याने भीमाशंकरला जाते. मी काही फारसा जात नाही. ही आठवण सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर पवारांनी आणखी एक आठवण सांगितली, दिलीपरावांचे वडील दत्तात्रय पाटील एकदा माझ्याकडे दिलीपला घेऊन आले. माझा मुलगा ग्रॅज्युएट झाला. त्याला नोकरी लावा, अशी विनंती त्यांनी मला केली. त्यावेळी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष नानासाहेब सकपाळ होते. मी त्यांना सांगितले की, तुमच्याकडे जागा आहे की नाही मला माहिती नाही, पण आपल्या माणसाचा मुलगा आहे त्याच्या नोकरीचे बघा, असे सांगून मी दिलीपला त्यांच्याकडे पाठवले. त्यानंतर काय घडले माहिती नाही. अशी आठवणही पवारांनी सांगितली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसChief Ministerमुख्यमंत्री