शहरं
Join us  
Trending Stories
1
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
2
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
3
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
4
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
5
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
6
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
7
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
8
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
9
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
10
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
11
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
12
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
13
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
14
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
15
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
16
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
17
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
18
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
19
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
20
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
Daily Top 2Weekly Top 5

लहान भावासह आइस्क्रीमसाठी बाहेर पडल्या आणि प्रियकराला भेटण्यासाठी त्या पोहोचल्या दिल्लीत, ठाणे पोलिसांच्या तत्परतेने दोन्ही बहिणी घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 08:03 IST

लहान भावासह आइस्क्रीम खाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडलेल्या सख्ख्या बहिणी दिल्लीतील प्रियकराला भेटण्यासाठी अचानक गायब झाल्या, पण गणेशोत्सवाच्या धामधुमीतही ठाणेनगर पोलिसांनी त्यांना शोधून काढले.

पंकज रोडेकर ठाणे : लहान भावासह आइस्क्रीम खाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडलेल्या सख्ख्या बहिणी दिल्लीतील प्रियकराला भेटण्यासाठी अचानक गायब झाल्या, पण गणेशोत्सवाच्या धामधुमीतही ठाणेनगर पोलिसांनी त्यांना शोधून काढले.या प्रकरणी विवाहित आणि दोन मुलांचा बाप असलेल्या लम्बू ऊर्फ अजिज अब्दुल हमीद शेख याला अटक केली असून त्याने त्या दोघींपैकी एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले.महागिरीत राहणा-या १९ आणि १४ वर्षीय बहिणी लहान भावासह आइस्क्रीमच्या बहाण्याने गेल्या. तो दुकानात गेल्यावर त्या गायब झाल्या. तीन दिवस झाले, तरी मुली घरी येत नसल्याने पालकांनी २४ आॅगस्टला तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपास पथक तयार करून शोधकार्य सुरू केले. कुटुंबीयांची चौकशी केली, त्यात हे कुटुंब कोलकाता येथून ठाण्यात आल्याचे व तीन महिन्यांपूर्वी दिल्लीला गेल्याचे समजले. तेथील मुख्य मार्केट येथे राहणाºया लम्बूचे मुलीला सतत फोन येत होते, असे लहान भावाने सांगितल्याने त्या आधारे तपासाला सुरुवात झाली. फोन नंबरच्या आधारे त्याचे लोकेशन शोधले आणि दिल्ली पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याच्या आणखी एका नंबरबाबत विचारणा केल्यावर त्याने तो नंबर पत्नीचा असल्याचे सांगितले. पण तोच नंबर त्या मुलीकडे असल्याचे समोर आले. फोन केल्यावर तिने दादरला असल्याचे सांगितले. पण संशय आल्याने लोकेशन तपासल्यावर ती दिल्लीत असल्याचे उघड झाले. त्यानंतर दोन्ही मुलींची पोलिसांनी सुटका केली आणि लम्बूला अटक केली. त्यानेच तिला भेटण्यासाठी दिल्लीत बोलावल्याचेही उघड झाले. 

टॅग्स :Policeपोलिस