एक झोका निखळला..
By Admin | Updated: August 7, 2014 01:47 IST2014-08-07T01:47:31+5:302014-08-07T01:47:31+5:30
स्मिता तळवलकर यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून केली. तब्बल 17 वर्षे त्या तिथे कार्यरत होत्या.

एक झोका निखळला..
>स्मिता तळवलकर यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून केली. तब्बल 17 वर्षे त्या तिथे कार्यरत होत्या. या कालावधीत दूरदर्शनच्या बातम्या आणि स्मिता तळवलकर यांचे
अतूट समीकरण बनले होते. बालपणापासूनच त्यांना रंगभूमीची ओढ होती. स्मिताताईंनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात अनेक नाटकांत कामे केली आणि त्यानंतर मोहन वाघ यांच्या चंद्रलेखा नाटय़संस्थेच्या छावा नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. महंत, अपराध मीच केला, तू फक्त हो म्हण, देखणी बायको दुस:याची, चाफा बोलेना, तुला यावंच लागेल, अपूर्णाक, स्वप्नात रंगले मी़़़ अशा अनेक नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. गेल्या वर्षीच त्यांनी ‘दुर्गाबाई जरा जपून’ या नाटकात भूमिका साकारली होती. आजाराशी दोन हात करत त्यांचे रंगभूमीवर झालेले पुनरागमन सर्वाना सुखावून गेले होते.
‘स्मितहास्य’ लोपले
आपल्या सकस आणि दमदार अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीला लोकप्रियता मिळवून देणा:या ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीतील स्मितहास्य लोपले आहे. नव्या पिढीतील कलावंतांना विविध व्यासपीठांवर संधी देणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. स्मिता तळवलकर यांनी चित्रपट अभिनयाबरोबरच नाटय़दिग्दर्शन, वृत्तनिवेदन, दूरचित्रवाणी अशा विविध क्षेत्रंत आपली कामगिरी बजावली. पुरस्कार मिळवत असताना कर्तव्यभावनेने मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीला अधिक यश मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या निधनामुळे नव्या कलावंतांचा आधार हरपला आहे. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीची झालेली हानी न भरून निघणारी आहे.
- पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री
कलाक्षेत्रची हानी
स्मिताताईंच्या निधनानं मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोभस, संवेदनशील, हरहुन्नरी असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं असून महाराष्ट्राच्या कलासृष्टीतलं त्यांचं योगदान रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. दूरदर्शनवरील निवेदिकेच्या भूमिकेतून सर्वदूर पोहोचलेल्या स्मिताताई अनेक मराठी कुटुंबांतील कळत-नकळतपणो सदस्य बनल्या होत्या. मराठी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका अशा सर्वच क्षेत्रंत त्यांनी आपल्या अभिनय आणि दिग्दर्शन कौशल्याचा ठसा उमटवला आहे. संवेदनशील व्यक्तिमत्त्व आणि सहजसुंदर अभिनयाच्या बळावर त्यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. नवोदित कलाकारांसाठी त्या आदर्श आणि आधार होत्या. महाराष्ट्राचं कलाक्षेत्र समृद्ध करण्यात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. त्यांच्यासारख्या कलावंताचं निधन ही महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रचीही हानी आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
चतुरस्र अभिनेत्री हरपली
स्मिताचा आणि माझा 1986 पासूनचा परिचय होता. तू फक्त हो म्हण’ या नाटकापासून आमची मैत्री जमली. तिचे चित्रपट उत्तम कथानक असणारे होते. मनोरंजन क्षेत्रतले सगळे प्रकार तिने हाताळले. तिने आजारपणाला सामथ्र्याने तोंड दिले. माणूस म्हणून ती मोठी होती व अभिनेत्री म्हणून चतुरस्र होती. - लता नाव्रेकर
शेवटर्पयत जिद्दीने कार्यरत
स्मितासोबत मी तिन्ही क्षेत्रंत काम केले आहे. ती उत्कृष्ट अभिनेत्री तर होतीच, पण माणूस म्हणून ती मला अधिक आवडायची. मी निर्माता झालो तेव्हा तिने खूप मदत केली. यंदा नाटय़ परिषदेच्या मुलुंड शाखेचा कार्यक्रम झाला, तेव्हा आजारी असूनही तिने मुलाखतीचा कार्यक्रम केला. तोर्पयत तिच्या 6क् केमो झाल्या होत्या. शेवटर्पयत ती जिद्दीने कार्यरत राहिली. - कुमार सोहनी
ते राहून गेले
आमची चांगली मैत्री होती. मला घेऊन एक चित्रपट त्यांना करायचा होता. त्याची कथाही मला त्यांनी ऐकवली होती. पण, आता ते राहून गेले आहे. - विनय येडेकर
ऋण विसरू शकत नाही
मी आज जो काही आहे, त्याची सुरुवात स्मिता तळवलकर यांनी करून दिली. माङो बकोटे पकडून त्यांनी मला राऊ’ मालिकेत उभे केले. जिद्द आणि प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी केली. त्यांचे ऋण कधीच विसरू शकत नाही.
- मनोज जोशी
माणूसपण न विसरणारी
1973-74 मध्ये दूरदर्शनमध्ये माझी व तिची गाठ पडली. तेव्हा ती बारावीत शिकत होती. वृत्तनिवेदिकेचे उत्तम गुण तिच्यात होते. माणूसपण न विसरणारी अशी कलाप्रांतातली ती सहकारी होती. अनेक चढउतार पाहता झाशीच्या राणीसारखे तिने तिचे व्यक्तिमत्त्व घडवले. -विश्वास मेहेंदळे
संवेदनशील निर्मात्या
सातच्या आत घरात’ या चित्रपटापासून आमची मैत्री होती. त्या संवेदनशील निर्मात्या होत्या. अनेक अर्थपूर्ण चित्रपट त्यांनी दिले.
- संजय छाब्रिया
आता ते होणार नाही
एवढय़ा कमी वयात त्यांची एक्ङिाट होणो पटत नाही. त्यांच्याकडून पुढेही चांगल्या कामाच्या अपेक्षा होत्या. पण, आता ते होणार नाही. - आशुतोष घोरपडे
उत्कृष्ट दिग्दर्शक
शर्यत रे आपुली’ या माङया मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी उत्कृष्टपणो पार पाडली. त्यांच्यामुळे ही मालिका यशस्वी होऊ शकली. - विसुभाऊ बापट
माझी ‘अवंतिका’ हरपली!
स्मिताताई आणि माझं नातं वेगळंच होतं. ताईचं व्यक्तिमत्त्व उत्फुल्ल होतं़ तिच्यासारखा खमकेपणा मी दुस:या कुठल्याच स्त्रीमध्ये पाहिलेला नाही. तिच्या शब्दकोशात ‘नाही’ हा शब्दच नव्हता. त्यामुळे जगण्याला भिडणारी स्मिताताई आता नाही, यावर विश्वासच बसत नाही. मी पोरकी झालेय, तिचं जाणं ही माझी वैयक्तिक हानी आहे. आमची ओळख झाल्यापासून कायम मला ‘स्मिताताई’ सारखं
व्हावं, असंच वाटायचं.
अवंतिका मालिका करताना आमची पहिली भेट झाली होती. या मालिकेच्या वेळी मी आधीच चार हिंदी मालिका करत होते. त्यामुळे ती करायला जमणार नाही, भूमिकाही कठीण आहे, असे मी तिला सांगितले. त्यावर, ती खळखळून हसली़ ती म्हणाली तुला जमणार नाही, असं काहीच नाही. माङयातल्या अभिनेत्रीला तिने पैलू पाडल़े तिचा माङया कामावर विश्वास होता़ त्यामुळेच मी ‘अवंतिका’ साकारू शकले. ‘अवंतिका’ मालिकेच्या ताईची एक खास आठवण माङयासोबत कायम राहील. ‘अवंतिका’साठी पहिला सीन करत असताना त्या पात्रचा बेधडकपणा, तडफदार व्यक्तिमत्त्व पाहून मी ताईला पुन्हा नकार दिला होता. पण, काही दिवसांनी एक गोष्ट लक्षात आली, ‘अवंतिका’ करताना ज्या वेळी मला वाटेल की, हा सीन मला जमणार नाही, त्या वेळी मी मनात अशा प्रसंगात स्मिता ताई कशी वागेल, याचा विचार करेन आणि त्याप्रमाणो करायचा प्रयत्न करेन. त्यामुळेच मग पुढे आयुष्यभरासाठी तीच माझी ‘अवंतिका’ झाली.
ताईला कॅन्सरचे निदान झाल्यावरही ती खचली नाही. तिने तिची झुंज कायम राखली़ तिचे दु:ख कधीच चेह:यावर आणले नाही. रसिकांमध्ये तिची जी प्रतिमा आहे, ती तिने कायम जपली होती. मी दिग्दर्शनाच्या क्षेत्रकडे वळल्यावरही वेळोवेळी तिने सल्ला दिला़ हक्काने चुकाही सांगितल्या. ती माझी प्रेरणास्नेत होती़ रमा माधव या माङया नवीन चित्रपटासाठी तिने मला आशीर्वादही दिला होता. ताईने मला इंडस्ट्रीतली दुसरी ‘स्मिता तळवलकर’ हो..! असंही म्हटलं होतं़ तिचे हे शब्द अविस्मरणीय आहेत. मी ते शब्द कधीच विसरू शकणार नाही. पण, तिच्यासारखी दुसरी ताई होणो शक्यच नाही.
मृणाल कुलकर्णी
अभिनेत्री
अभिनेत्री ते निर्माती अन् दिग्दर्शिका
‘चौकट राजा’ हा माङया कारकिर्दीतला अतिशय महत्त्वाचा सिनेमा. त्याची स्मिता निर्माती होती. या चित्रपटातला नंदू हा मानसिक विकलांग मुलाची भूमिका सुरूवातीला परेश रावळ करणार होते. स्मिता त्याच्या लहानपणच्या मैत्रिणीची भूमिका करीत होती आणि मी तिच्या पतीच्या भूमिकेत होतो. काही कारणामुळे चित्रीकरण सुरू व्हायच्या आधी दोन दिवस परेश रावळनी भूमिका करणार नसल्याचे सांगितले. त्यावेळी ती भूमिका मी करू शकेन, असे पहिल्यांदा स्मिताला वाटले. तिच्यामुळे आणि दिग्दर्शक संजय सूरकर यांच्यामुळे या भूमिकेचा अनुभव मला घेता आला. पुढे या भूमिकेला आणि चित्रपटाला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला. त्यानंतर तिचीच निर्मिती असलेली ‘साळसूद’ ही मालिकाही मी केली. त्यात माझी भूमिका विकृत खलनायकाची होती. माङया व्यक्तिमत्त्वाशी अगदी विसंगत अशी ही भूमिका मी करू शकेन हा विश्वास स्मितानीच दाखविला. पुढे तिच्याबरोबर मी ‘घरकुल’ ही मालिकाही केली. स्मिता दूरदर्शनवर निवेदिका म्हणून काम करीत होती, तेव्हापासून ओळखत होतो. त्यानंतर ती अभिनेत्री बनली. नंतर निर्माती आणि दिग्दर्शक. तिच्यात धडाडी होती, नविन काही करण्याची जिद्द होती. ती निर्माती झाली, ती अगदी लहानवयात. या पुरूषप्रधान इंडस्ट्रीमध्ये इतक्या लहान वयाच्या महिलेने आपले स्थान मिळवू पाहणो आणि आपला ठसा उमटविणो ही खूपच कठिण गोष्ट होती; पण ती तिने करून दाखविले.
‘चौकट राजा’च्या वेळची एक आठवण आहे. या चित्रपटात नंदूच्या आईचे निधन होते. कलादिग्दर्शक अजित दांडेकरने रविंद्र नाटय़मंदिरात स्मशानाचा सेट लावला होता. तो आम्हाला ख:यासारखा वाटेना. शेवटी स्मिताने सगळे सोपस्कार एकटीने पार पाडून या प्रसंगाचे चित्रण ख:या स्मशानामध्ये केले. या प्रसंगात मी, अशोक सराफ आणि सुलभा देशपांडे हे तिघेजणच होतो. सुलभाताईंना एकटे वाटू नये म्हणून स्मिता चित्रिकरणाच्यावेळी स्मशानातही हजर झाली होती. तिच्या आजारालाही तिने खूप धैर्याने तोंड दिले. आताही ती यातून बाहेर पडेल, असे वाटत होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. - दिलीप प्रभावळकर
धडाडीची निर्माती
स्मिता धडाडीची निर्माती
होती. तिने निर्माती म्हणून केलेल्या चित्नपटांना तोड नाही. सदैव प्रसन्न आणि हसतमुख असे तिचे व्यक्तिमत्त्व होते. तिच्याबरोबर काम करणो, ही माङयासाठी आनंदाची गोष्ट होती.
- अशोक सराफ