मुलगा लक्ष देत नाही म्हणून सासूने केली सूनेची हत्या

By Admin | Updated: August 9, 2016 17:57 IST2016-08-09T17:41:53+5:302016-08-09T17:57:41+5:30

मुलगा बायकोकडे जास्त लक्ष देतो म्हणून संतापलेल्या आईने सुनेची आणि तिच्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

Sleeping murdered by the boy as the boy does not pay attention | मुलगा लक्ष देत नाही म्हणून सासूने केली सूनेची हत्या

मुलगा लक्ष देत नाही म्हणून सासूने केली सूनेची हत्या

ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. ९ - मुलगा बायकोकडे जास्त लक्ष देतो म्हणून संतापलेल्या आईने सुनेची आणि तिच्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंब्र्यामध्ये घडली. राशिदा अकबाराली वासानी असे आरोपी महिलेचे नाव आहे. राशिदाने सून सलमा (२४) आणि तिची आई शमीम शेखला (५४) यांच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळले. 
 
जेवण घेतल्यानंतर गुंगीच्या औषधामुळे दोघींना गाढ झोप लागली. त्यानंतर राशिदने घरातील धारदार शस्त्राने दोघींचा गळा चिरला व कान कापले असे पोलिस निरीक्षक सुखदा नारकर यांनी सांगितले. हत्या करुन राशिदाने पोलिस स्थानकात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. 
 
राशिदाला हत्येच्या कलम ३०२ आणि कलम ३२८ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सलमा आणि राशिदाचा मुलगा मकदूम यांचा चारवर्षांपूर्वी विवाह झाला होता. अलीकडेच सलमाची प्रसूती झाली होती. तिला मदत करण्यासाठी सलमाची आई शमीम मुंब्र्याला तिच्या घरी आली होती. मकदूम आपल्याकडे दुर्लक्ष करुन बायकोकडे जास्त लक्ष देतो अशी राशिदाची धारणा झाली होती. 
 
 
 

Web Title: Sleeping murdered by the boy as the boy does not pay attention