गोरेगावमध्ये स्लॅब कोसळला
By Admin | Updated: July 16, 2014 03:35 IST2014-07-16T03:35:02+5:302014-07-16T03:35:02+5:30
गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशनजवळील काकाजी नगरमधील प्रसाद शॉपिंग सेंटर इमारतीचा स्लॅब मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास कोसळला

गोरेगावमध्ये स्लॅब कोसळला
मुंबई : गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशनजवळील काकाजी नगरमधील प्रसाद शॉपिंग सेंटर इमारतीचा स्लॅब मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास कोसळला. यामध्ये पुरुषोत्तम यादव या सोळा वर्षाच्या मुलाचा व नासीर (३0) या दोघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. जखमींवर सिद्धार्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रसाद शॉपिंग सेंटर ही इमारत पंधरा ते वीस वर्षे जुनी असून रहिवाशी व इमारतीच्या मालकामध्ये पुनर्विकासावरून वाद सुरु होता. याच इमारतीचा भाग रात्री पावणे दहा वाजता चार दुकानांवर कोसळला. त्यात ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले होते. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन अडकलेल्या नऊ जणांना बाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने ढिगारा हटविण्याचे काम सुरु होते. (प्रतिनिधी)