उजळून देण्याच्या बहाण्याने सहा तोळे सोने पळविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 19:50 IST2018-01-20T19:49:47+5:302018-01-20T19:50:01+5:30
सोने उजळून देण्याचा बहाणा करुन दोघा अज्ञातांनी सहा तोळे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास देवणी येथे घडली.

उजळून देण्याच्या बहाण्याने सहा तोळे सोने पळविले
देवणी - सोने उजळून देण्याचा बहाणा करुन दोघा अज्ञातांनी सहा तोळे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास देवणी येथे घडली. पोलिसांनी सांगितले की, देवणी येथील नरहरी (नाना) देवणीकर यांच्या पत्नी शोभा नरहरी देवणीकर व करुणा माधवराव जोशी या दोघी शनिवारी दुपारी घरी होत्या.
तेव्हा दोघेजण घरी आले़ त्यांनी आम्ही सोने उजळून देतोत, असे सांगितले़ त्यामुळे शोभा देवणीकर यांनी हातातील अंगठी काढून दिली असता त्या दोघांनी उजळून दिली. त्यानंतर देवणीकर यांनी पाटल्या, बिल्वर, बांगड्याही उजळून देण्यासाठी आणल्या. हे दागिने हातात घेऊन त्या दोघांनी गरम पाणी आणण्यासाठी त्यांना सांगितले़ दरम्यान, या दोघांनी सहा तोळ्याचे दागिणे घेऊन पसार झाले.
त्याची किंमत दीड लाख रुपये आहे. याप्रकरणी नरहरी देवणीकर यांच्या फिर्यादीवरुन देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोकॉ सरफराज गोलंदाज, योगेश फुले हे करीत आहेत.