शिवडीत गोळीबार, एकाचा मृत्यू
By Admin | Updated: July 21, 2016 08:23 IST2016-07-21T00:26:43+5:302016-07-21T08:23:36+5:30
बारमध्ये दारू पित बसलेल्या दोन गुंडांमध्ये झालेल्या वादातून हल्लेखोराने सुशांत गोडेकर या गुंडावर तीन गोळ्या झाडल्या

शिवडीत गोळीबार, एकाचा मृत्यू
>
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 21 - बारमध्ये दारू पित बसलेल्या दोन गुंडांमध्ये झालेल्या वादातून हल्लेखोराने सुशांत उर्फ बंटी घोडेकर या गुंडावर तीन गोळ्या झाडल्या. बुधवारी बाराच्या सुमारास शिवडीतील जयभीमनगरमध्ये ही घटना घडली. रात्री 12च्या सुमारास पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुशांत उर्फ बंटी घोडेकर भायखळा पूर्वेकडील घोडपदेव मधील रहिवासी आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही अभिलेखावरील आरोपी आहेत. जयभीमनगर परिसरात सुशांत हा आरोपीसोबत दारू पिण्यास बसला असताना दोघांमध्ये वाद झाला. याच वादात हल्लेखोराने त्याच्याकडील चाकूने सुशांतवर वार केले. त्यानंतर बचावासाठी बाहेर पळताच त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि तेथून पळ काढला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सुशांतला जे जे रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे दाखल करण्या पूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती शिवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुधीर नागवे यांनी दिली.