शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

जरांगेंची एसआयटी चौकशी; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 06:37 IST

पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सभागृहात सुरुवात होताच भाजपचे आशिष शेलार यांनी जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबाबत केलेल्या विधानांचा विषय उपस्थित केला. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही हल्लाबाेल केला. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठा आंदोलनातील हिंसक वक्तव्ये आणि हिंसक कृती यांची सखोल चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) करण्याचे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. ‘छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन आंदोलन करताना मायबहिणीच्या शिव्या द्यायच्या ही कोणती संस्कृती’, असा सवाल करीत, ‘मनोज जरांगे पाटलांशी मला घेणेदेणे नाही, पण त्या निमित्ताने जे काही घडत आहे त्याच्यामागील सूत्रधार कोण हे शोधावेच लागेल. कोण, काय-काय केले याची सगळी चौकशी करून षडयंत्र बाहेर काढले जाईल’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सभागृहात सुरुवात होताच भाजपचे आशिष शेलार यांनी जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबाबत केलेल्या विधानांचा विषय उपस्थित केला. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही हल्लाबाेल केला. 

वॉररूम कोणी सुरू केल्या, पैसा कुठून आला? मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी काय, काय केले हे समाजाला माहिती आहे. मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. जे माझ्याबद्दल बोलले त्यांच्या पाठीशी नाही तर माझ्या पाठीशी समाज आहे. तरीही जरांगे यांच्याविषयी माझी तक्रार नाही. पण, या सगळ्याच्या पाठीशी कोण आहे हे शोधावे लागेल. बोलविता धनी कोण ते शोधले जाईल. ते बोलले त्याची स्क्रिप्ट कुठून आली, नवी मुंबईत आंदोलनावेळी तिथे, छत्रपती संभाजीनगर अन् पुण्याला वॉररुम कोणी सुरू केल्या होत्या या सगळ्यांची चौकशी करावी लागेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

अशांतता पसरवण्यासाठी कोणी, कुठून पैसा पुरवला याची माहिती समोर येत आहे. आंदोलनस्थळी जरांगेंना परत कोणी आणून बसविले, कोणाकडे बैठकी झाल्या, दगडफेक करा असे कोणी सांगितले, बीडच्या घटनेत कोण होते हे सगळे समोर येईलच असे त्यांनी बजावले.

जरांगे यांची दिलगिरीछत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत दिलीगिरी व्यक्त केली आहे. कोणाचीही माय, बहीण काढणे योग्य नाही, असे नमूद करीत जरांगे यांनी ‘फडणवीस यांच्याबद्दल जे बोललो ती चूक झाली; याविषयी मी दिलगिरी व्यक्त करतो,’ अशा शब्दांत एक पाऊल मागे घेतले. 

शरद पवार यांचा पाठिंबा घेतला नाहीमी शरद पवार यांचा पाठिंबा घेतला नाही. सहा महिन्यांत उपमुख्यमंत्री फडणवीसांविरुद्ध मी बोललो नाही. पण ते आता खुनशीपणाने वागत आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर त्यांनी एसपींना सांगून गुन्हे नोंदवायला लावले. अंतरवाली सराटी येथील गुन्हे परत घेतले नाहीत. यामुळे विरोधात बोललो. मी कोणत्याही राजकीय पक्ष अथवा नेत्यांच्या विरोधात आणि जवळचा नाही, असेही जरांगे म्हणाले.

...तर राजकारणातून संन्यास : राजेश टोपेमराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी आपला कोणताही संबंध नाही. यात मी दोषी आढळलो तर राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान माजी मंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी विरोधकांना दिले आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे टोपे यांचा हात असल्याचा आरोप भाजपने केला होता. त्याला टोपे यांनी विधानभवनात माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलRahul Narvekarराहुल नार्वेकरMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस