धक्कादायक...! राखी बांधण्यापूर्वी बहिणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 18:08 IST2017-08-06T18:07:10+5:302017-08-06T18:08:26+5:30

भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी येणार असल्याचे सांगीतल्याने बहिणीची वाट बघत असलेल्या भावाला मात्र तिच्या मृत्यूचीच बातमी मिळाली.

Sister's suicide before raising Rakhi | धक्कादायक...! राखी बांधण्यापूर्वी बहिणीची आत्महत्या

धक्कादायक...! राखी बांधण्यापूर्वी बहिणीची आत्महत्या

गोंदिया, दि. 6 : भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी येणार असल्याचे सांगीतल्याने बहिणीची वाट बघत असलेल्या भावाला मात्र तिच्या मृत्यूचीच बातमी मिळाली. ही दुर्देवी घटना येथील गोविंदपूर येथे घडली. प्रीती टीटू कावडे (२९) असे महिलेचे नाव असून तिने विषप्राशन करून रविवारी सकाळी ६ वाजता आत्महत्या केली.
प्रीतीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह आणला असता तिची आई आक्रोश करीत रडत होती. प्रिती राखी बांधण्यासाठी माहेरी येणार होती. या आत्महत्येसंदर्भात तिच्या भावाने संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तिचे नोव्हेंबर २०१३ मध्ये टिटू कावडे सोबत लग्न झाले होते. प्रीतीचा पती टीटू कावडे हुंड्यासाठी तिचा शारिरिक व मानसिक छळ करीत होता.प्रितीला तीन वर्षाचा मुलगा आहे. ती विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत नोकरी करीत होती. तिचा पती टीटू काहीच काम करीत नव्हता. ती पती सोबत वेगळी राहात होती. बँकेतून कर्ज काढून तीने पतीला मदतही केली होती. नेहमीच होणाºया छळापायी ती कंटाळलेली होती. तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

पाच जण पोलिसांच्या ताब्यात
खलाशी लाईन, शिव मंदिर रोड नागपूर येथील नितेश यशवंत मेश्राम (३४) यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी प्रितीचा पती टीटू, सासू बाया, सासरा बालकृष्ण, भासरा गजेंद्र व दिर उमेश कावडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूध्द भादंविच्या कलम ३०४ (ब), ३०६, ३४ हुंडा प्रतिबंधक कायद्याचे कलम ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Sister's suicide before raising Rakhi