शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 06:47 IST

ST Bus News: पासची मुदत संपली म्हणून पाचवीतील आदिवासी विद्यार्थ्यांला एसटी बस वाहकाने भरपावसात खाली उतरवले. माणुसकीला लाजवणारी ही घटना चोपडा तालुक्यातील उनपदेव - अडावद या गावादरम्यान १९ ऑगस्टला सकाळी घडल्याची बाब समोर आली आहे.

- पी. आर. माळीचोपडा (जि. जळगाव) - पासची मुदत संपली म्हणून पाचवीतील आदिवासी विद्यार्थ्यांला एसटी बस वाहकाने भरपावसात खाली उतरवले. माणुसकीला लाजवणारी ही घटना चोपडा तालुक्यातील उनपदेव - अडावद या गावादरम्यान १९ ऑगस्टला सकाळी घडल्याची बाब समोर आली आहे. बादल राजाराम बारेला (रा. उनपदेव) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. उनपदेवनजीक असलेल्या पाड्यावर तो राहतो. तिथून रोज सहा किमी अंतरावर असलेल्या अडावद येथील शाळेत जात असतो.

घटनेची चौकशी करण्याची मागणी दरम्यान, या घटनेविषयी कर्जाणे येथील उपसरपंच प्रमोद बारेला आणि बिरसा ब्रिगेड सातपुडाचे अध्यक्ष रामदास पावरा यांनी चोपडा येथील आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. 

पायपीट करून आला घरीविद्यार्थी उनपदेव-आडगाव- चोपडा बसने शाळेत जाण्यासाठी निघाला. परंतु त्याच्याकडील मासिक पास १७ ऑगस्टला संपली होती. पैसे नसल्याने त्याने पासचे नूतनीकरण केले नव्हते. उनपदेव येथून बस दोन ते तीन किमी पुढे निघाली.

वाहकाने त्याला तिकिटाविषयी विचारले असता. पास संपल्याचे त्याने सांगितले. यावर वाहकाने त्याला अपशब्द वापरले आणि एका ठिकाणी थांबवून भरपावसात खाली उतरवले. पावसात भिजत हा विद्यार्थी दोन ते तीन किमी पायी चालून उनपदेवनजीक पाड्यावर आपल्या घरी परतला.

शाळकरी मुलाला भरपावसात बेजबाबदारपणे रस्त्यात उतरवून देणे हा अमानुषपणा आहे. या प्रकाराची चौकशी करावी. तसेच आदिवासी मुलांसाठी वेगळी बस उपलब्ध करून देण्यात यावी.- प्रमोद बारेला, उपसरपंच, कर्जाणे, ता. चोपडा. 

घडलेल्या या प्रकाराबाबत संबंधित बसमधील वाहकाबाबत तक्रार प्राप्त झालेली आहे. ती तक्रार विभागीय पातळीवर पाठवली आहे. त्याची चौकशी होऊन पुढील कारवाई करता येईल. - महेंद्र पाटील, आगार प्रमुख, चोपडा.

टॅग्स :state transportएसटीStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्र