शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

साहेब, बॉम्बस्फोट होणार...; मद्यपी अन् मनोरुग्णाने उडवली पोलिसांची झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 07:07 IST

पंतप्रधानांच्या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांची विशेष सतर्कता

मुंबई : साहेब, टपरीवर उभे असलेले दोन जण बॉम्बस्फोट होणार, असे बोलत असल्याच्या माहितीच्या कॉलने खळबळ उडाली. पोलिसांनी मुलुंड टोलनाका परिसर पिंजून काढला. मात्र, हाती काही लागले नाही. अखेर, कॉल करणाऱ्या दीपक कांबळे (३३) या तरुणाचा शोध घेत पोलिसांनी कारवाई केली. त्याने दारूच्या नशेत खोटी माहिती दिल्याचे समोर आले. दुसऱ्या घटनेत इंडियन मुजाहिदीनच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर फोन करून विमानतळ उडवण्याची धमकी देणाऱ्या इरफान शेख या मनोरुग्णाला पोलिसांनी अटक केली.     

ठाणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ११२ क्रमांकाच्या हेल्पलाइनवर सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आलेल्या कॉलवर संबंधिताने  मुलुंड चेकनाकाजवळील पानटपरीवर दोन व्यक्ती बॉम्बस्फोट होणार आहे, अशी चर्चा करत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या परिसरात शोध घेतला. मात्र काहीही संशयास्पद आढळून आले नाही. अखेर, पोलिसांनी मोबाइल लोकेशननुसार, मॉडेल चेकनाका येथील पार्किंगमधून कॉल करणाऱ्याला ताब्यात घेतले.  

दीपक कांबळे नावाचा तरुण हा मूळचा सांगलीचा रहिवासी असून ठाण्यात राहतो. तो चालक म्हणून काम करतो. त्याने दारूच्या नशेत कॉल केल्याचे स्पष्ट होताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.   साेमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विमानतळावर फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण इंडियन मुजाहिदीनशी संबंधित असल्याचे सांगत विमानतळ उडवण्याची धमकी दिली होती. १० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदीमुंबईत येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला गोवंडी येथून ताब्यात घेतले. चौकशीत तो असंबंध बडबडत होता. तो मनोरुग्ण असल्याने कुणीतरी त्याला फोन करण्यास भाग पाडले असावे का, या दृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.   यासंदर्भात उपायुक्त सिद्धार्थ गेडाम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अधिक चौकशी करीत असून, आताच कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे होईल, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वीचे कॉल- गेल्या आठवड्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ईमेल आयडीवर गुरुवारी रात्री धमकीचा मेल आला.- धमकी देणाऱ्या व्यक्तीने तो स्वतः तालिबानी असल्याचा दावा करत तालिबानी संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीने हा आदेश दिला असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

धमकीचे २६ मेसेज -मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देत ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर धमकीचे तब्बल २६ मेसेज पाठवले होते. यामध्ये २६/११ सारखा हल्ला होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. कंट्रोल रूमच्या व्हॉट्सॲपवर पाकिस्तानी नंबरवरून या धमकीची माहिती देण्यात आली होती. दहशतवादी हल्ल्याच्या धमकीच्या मेसेज प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विरार परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNarendra Modiनरेंद्र मोदीPoliceपोलिसMumbaiमुंबई