ज्येष्ठ धृपद गायक उस्ताद सईदउद्दीन डागर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 07:15 IST2017-07-31T00:52:13+5:302017-07-31T07:15:21+5:30

ज्येष्ठ धृपद गायक उस्ताद सईदउद्दीन डागर (वय ७८) रविवारी रात्री निधन झाले. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. 

Singer Saeeduddin Dagar passes | ज्येष्ठ धृपद गायक उस्ताद सईदउद्दीन डागर यांचे निधन

ज्येष्ठ धृपद गायक उस्ताद सईदउद्दीन डागर यांचे निधन

पुणे, दि. 31 - ज्येष्ठ धृपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर (वय 78) यांचे रविवारी रात्री निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे.

जयपूर येथील बहराम खाँ डागर या निवासस्थानजवळील दर्गा परिसरात त्यांचा दफनविधी होणार आहे. धृपद गायकीच्या क्षेत्रातील तारा म्हणून ते ओळखले जात होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी गायनाची साधना सुरू ठेवली होती़. डागर घरण्यातल्या 19व्या पिढीतील ते गायक होते़. डागर घराण्याची परंपरा थेट स्वामी हरिदासजींपर्यंत पोहोचते़. मूळचे राजस्थानातील असलेले सईदुद्दीन बंगालमध्ये स्थायिक झाले होते़ त्यांचा जन्म  20 एप्रिल 1939 रोजी जयपूर येथील बहराम खाँ डागर येथे झाला़. 1984 सालापासून ते पुण्यात स्थायिक झाले होते़. त्यांची दोन्ही मुले नफीसुद्दीन आणि अनीसुद्दीन यांनी त्यांची धृपद गायकीची परंपरा पुढे चालू ठेवली आहे़. परदेशातही त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे़. 

Web Title: Singer Saeeduddin Dagar passes