गायक अभिजित वादाच्या भोवऱ्यात

By Admin | Updated: July 4, 2016 05:05 IST2016-07-04T05:05:56+5:302016-07-04T05:05:56+5:30

ट्विटरवर महिला पत्रकाराला शिवीगाळ आणि आक्षेपार्ह ट्विट केल्याने गायक अभिजित भट्टाचार्य वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Singer Abhimanyan Swapan | गायक अभिजित वादाच्या भोवऱ्यात

गायक अभिजित वादाच्या भोवऱ्यात


मुंबई : ट्विटरवर महिला पत्रकाराला शिवीगाळ आणि आक्षेपार्ह ट्विट केल्याने गायक अभिजित भट्टाचार्य वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चेन्नईतील युवतीच्या हत्येप्रकरणी अभिजितने ट्विट केले होते. या ट्विटवर तीव्र प्रतिक्रिया उमटली. यामुळे चिडलेल्या अभिजितने विरोधकांना पाकधार्जिणे ठरवत शिव्यांची लाखोली वाहिली.
चेन्नई येथील इन्फोसिसची कर्मचारी एस. स्वाती हिची गळा चिरून हत्या करण्यात आली. हा लव्ह जिहादचा विषय असून, हिंदू पालकांना स्वातीसाठी न्याय हवा आहे, असे ट्विट अभिजितने केले होते. या ट्विटमुळे धार्मिक हिंसा उफाळण्याची शक्यता असल्याने अभिजितला अटक करण्याची मागणी स्वाती चतुर्वेदी या महिला पत्रकाराने केली. पाकिस्तानी कलाकारांमुळे अभिजितचे करिअर संपल्याने तो द्वेष करीत असल्याचा दावा चतुर्वेदी यांनी ट्विटरवर केला. या ट्विटमुळे चिडलेल्या अभिजितने स्वाती चतुर्वेदीला ‘बेशर्म बुढिया’ म्हणत शिव्यांची लोखोली वाहिली.
अभिजितच्या या ट्विटवर अनेकांनी संताप व्यक्त करत त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांनी स्वाती चतुर्वेदी यांना तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.

Web Title: Singer Abhimanyan Swapan