शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

Sindhudurg Politics: राणेंना सहकार, शिवसेना,  महाविकास आघाडीची हार, सिंधुदुर्गात राजकीय समीकरणे बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 16:02 IST

Sindhudurg district Central cooperative bank Election Result: वादविवाद, आरोप-प्रत्यारोप, दोन्हीकडच्या बड्या नेत्यांनी लावलेली ताकद, मारहाणीच्या आरोपावरून आमदार नितेश राणेंच्या वाढलेल्या अडचणी, कोर्टकचेरी यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यात अखेर नारायण राणे आणि BJPने बाजी मारल्याने आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि त्याबरोबरच कोकणातील समिकरणे बदलणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

- बाळकृष्ण परब नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अखेर नारायण राणेंच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सिद्धिविनायक सहकारी पँनेलने बाजी मारली. तर  शिवसेना आणि महाविकास आघाडी पुरस्कृत समृद्धी सहकारी पँनेलला निसटता पराभव पत्करावा लागला. वादविवाद, आरोप-प्रत्यारोप, दोन्हीकडच्या बड्या नेत्यांनी लावलेली ताकद, मारहाणीच्या आरोपावरून आमदार नितेश राणेंच्या वाढलेल्या अडचणी, कोर्टकचेरी यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यात अखेर नारायण राणे आणि भाजपाने बाजी मारल्याने आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि त्याबरोबरच कोकणातील समिकरणे बदलणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

खरंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंचा पराभव झाला असला तरी सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद आणि काही पंचायत समित्यांवर त्यांचे वर्चस्व कायम होते. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी  बँकही त्यांच्याच ताब्यात होती. पण या बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यावरील राणेंचे वर्चस्व संपुष्टात आले होते. त्यामुळे या निवडणुकीत नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर काही करून राणेंना पराभवाचा धक्का द्यायचा, म्हणून इरेला पेटलेल्या शिवसेनेनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. शिवसेनेच्या बड्या नेत्यांपासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार हे या निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. त्यातच संतोष परब मारहाण प्रकरणात आमदार नितेश राणेंच्या अडचणी वाढल्यानंतर नारायण राणेंनीही जिल्ह्यात ठाण मांडले होते. अखेर या प्रतिष्ठेच्या लढाईचा कौल राणे आणि भाजपाच्या बाजूने लागला. त्यानंतर नारायण राणेंनी आता आपलं पुढील लक्ष्य राज्यातील सरकार असल्याची गर्जना केली. मात्र असं असलं तरी या निकालानंतर सिंधुदुर्गातील राजकीय समीकरणं  बदलतील, असं म्हणणं थोडं घाईचं ठरेल. पण त्यातून जिल्ह्यातील पुढच्या राजकीय घडामोडींचे संकेत मात्र निश्चितपणे मिळत आहेत.

शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू आहे. त्यातच २०१९ नंतर बदललेली राजकीय समीकरणे आणि केंद्रात नारायण राणेंना मंत्री बनवण्यात आल्यानंतर राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांकडून शिवसेनेविरोधात विशेष करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंविरोधात होणारी टीका तसेच नारायण राणेंवर झालेली अटकेची कारवाई ही त्याचीच काही उदाहरणे आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून एकमेकांना अस्मान दाखवण्याचा प्रयत्न वारंवार होत असतो.

दरम्यान, सिंधुदुर्गातील काही नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तोंडावर आहेत. यापैकी अनेक संस्थांमध्ये नारायण राणेंच्या नेतृत्वाखालील भाजपाचे वर्चस्व आहे. त्यामुळे या सर्वांवर वर्चस्व कायम ठेवण्याचे आव्हान नारायण राणेंसमोर आहे. तर सलग दोन वेळा सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा आणि कुडाळ-मालवण आणि वेंगुर्ला-सावंतवाडी हे विधानसभा मतदारसंघ जिंकल्यानंतरही शिवसेनेला जिल्ह्यात एकतर्फी वर्चस्व मिळवता आलेले नाही. त्यातच महायुती म्हणून निवडणूक लढूनही पराभव झाल्याने ही बाब शिवसेनेसाठी धक्कादायक आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून इतर निवडणुकांचा अंदाज बांधणे चुकीचे असले तरी या विजयामुळे नारायण राणे आणि भाजपाला आगामी राजकारणासाठी बुस्टर डोस मिळाला आहे हे नक्की. तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावता येत असल्याने त्याचाही त्यांना आगामी राजकारणात फायदा होणार आहे. दुसरीकडे शिवसेना जिल्ह्यात महायुती करून लढत असली तरी येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जनाधार हा अत्यल्प आहे. त्यामुळे सेनेला येथे बऱ्यापैकी स्वबळावर लढावे लागणार आहे. त्यातही सेनेकडे दीपक केसरकर, वैभव नाईक, विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत असे नेते असले तरी राणेंप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात व्यापक जनाधार असलेला नेता नाही, ती बाब शिवसेनेसाठी काहीशी अडचणीची ठरू शकते. तर केवळ एका जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे आता सिंधुदुर्ग जिल्हा भाजपामय होऊन राणेंचे पूर्वीप्रमाणे एकछत्री अंमल निर्माण झालाय, असं म्हणता येणार नाही. आता भविष्यातील निवडणुकांचा अंदाजच वर्तवायचा झाला तर पुढील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये नारायण राणेंच्या नेतृत्वाखालील भाजपाचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे. मात्र नारायण राणेंची खरी कसोटी २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लागणार आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी