शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री पट्ट्यात वळीव पावसाने शेतकऱ्यांची दैना, विजेच्या तारांवर फांद्या पडल्याने वीज गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:17 IST

Sindhudurg News:

कनेडी - कणकवली तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावांना मंगळवारी सायंकाळी वळिवाच्या वादळी पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने हजेरी लावल्याने  बेगमीसाठी ठेवलेले सामान झाकून ठेवताना शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून परिसरातील मार्ग बंद झाले होते. 

विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडून तुटल्याने  वीजही गायब झाली होती. दरम्यान, सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कणकवली शहर आणि परिसरातही काही काळ पावसाची रिमझिम सुरू होती. गेले दोन दिवस हवेत मोठी उष्णता निर्माण झाली होती. त्यामुळे पाऊस पडणार याची चाहूल नागरिकांना लागलीच होती. त्याचबरोबर हवामान विभागानेही ऑरेंज अलर्ट देत वादळी पावसाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे मंगळवारी  वळिवाच्या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडवून दिली. ठिकठिकाणी उभारून ठेवलेली भाताची उडवी भिजून गेली आहेत. 

वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आंबा, काजूलाही पावसामुळे  मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे चोहोबाजूने नुकसान झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. पावसाळी वातावरण निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी  चारा व उडवी झाकून ठेवल्या आहेत.  

सह्याद्री पट्ट्यात बरसलामंगळवारी सायंकाळी   वादळी पावसाने सह्याद्रीच्या पट्ट्यातील नाटळ, दिगवळे, नरडवे, कुंभवडे या गावांना झोडपून काढले. शेतकऱ्यांनी मशागत करण्यासाठी शेतात ठेवलेला पालापाचोळा भिजून गेला.  

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस