सिल्लोड आठवडी बाजारात घुसले काळवीट

By Admin | Updated: June 11, 2017 20:37 IST2017-06-11T20:37:41+5:302017-06-11T20:37:41+5:30

-कुत्रे मागे लागल्याने सिल्लोड येथील आठवड़ी बाजारात एक काळवीट घुसले

Silvester Weekly climbed in the market | सिल्लोड आठवडी बाजारात घुसले काळवीट

सिल्लोड आठवडी बाजारात घुसले काळवीट

 ऑनलाइन लोकमत
सिल्लोड, दि. 11 -कुत्रे मागे लागल्याने सिल्लोड येथील आठवड़ी बाजारात एक काळवीट घुसले.. नागरिकांची वर्दळ.. आठवड़ी बाजार, दुसरीकडे कुत्रे ..मागे लागल्याने सैरा वैरा पळणाऱ्या काळवीटाला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडूंन वनविभागाच्या सुपुर्द केले. 
रविवारी सिल्लोड येथील आठवड़ी बाजार होता.जंगलातून एक काळविट कुत्र्यांच्या तावडीतून सुटुन आठवड़ी बाजारात घुसले..बाजारात गर्दी व मागे लागलेले कुत्रे बघून काळविट घाबरले..हे दृश्य बघून लोकांनी पोलिसांना फोन केला.. सिल्लोड शहराचे सहायक पोलिस निरीक्षक शेख शकील यांनी त्या काळविटला पकडून सिल्लोड येथील वन विभागाच्या स्वाधीन केले. 
सिल्लोड वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी दहिवाळ यांनी विलास नरवडे व वनकर्मचाऱ्याच्या मदतीने उपचार करुण चिचपूर परिसरातील डोंगरात त्या काळविटला सोडले.

Web Title: Silvester Weekly climbed in the market