सिग्नलमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक आसनगावपर्यंत
By Admin | Updated: August 1, 2016 08:01 IST2016-08-01T08:00:08+5:302016-08-01T08:01:18+5:30
विविध कारणांमुळे विस्कळीत होणारी मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे.

सिग्नलमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक आसनगावपर्यंत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - कधी रुळाला तडा गेल्यामुळे, कधी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे, कधी ट्रॅकवर माती, तर कधी विद्युत पुरवठा बंद अशा विविध कारणांमुळे विस्कळीत होणारी मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे.
आठवडयाच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे कसा-याहून मुंबईच्या दिशेने येणा-या प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक आसनगावपर्यंत सुरु आहे.
खर्डीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे कसा-याहून आसनगावपर्यंत वाहतूक ठप्प झाली आहे. काल रविवारी पारसिक बोगद्याजवळ डोंगरावरची माती ट्रॅकवर आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.