मध्य प्रदेशातील शुटर अकोल्यात जेरबंद

By Admin | Updated: June 26, 2014 02:06 IST2014-06-26T01:55:56+5:302014-06-26T02:06:16+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : पिस्टल, जिवंत काडतूसही जप्त.

Shutter in Madhya Pradesh, Akolat Zarband | मध्य प्रदेशातील शुटर अकोल्यात जेरबंद

मध्य प्रदेशातील शुटर अकोल्यात जेरबंद

अकोला- मध्य प्रदेशातील एक कुख्यात आरोपी, शुटर वसीम खान अहेसान खान (३२) याला अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री उशिरा गडंकी रोडवर अटक केली. आरोपीकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
पिस्टलच्या खरेदी-विक्रीच्या एका व्यवहाराची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गडंकी रोडवरील सर्मथ गॅस गोडावूनजवळ सापळा रचला. यावेळी पोलिसांनी मंगळवारी रात्री १ वाजताच्या सुमारास वसीम खान अहेसानला पिस्टल आणि दोन जिवंत काड तुसांसह ताब्यात घेतले. तो मुळचा आगर जिल्ह्यातील सुसनार येथील असला तरी, गत काही दिवसांपासून तो अकोल्यातील नायगाव परिसरातील महेबूबनगरात राहत होता. याप्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने आरोपीची १ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

Web Title: Shutter in Madhya Pradesh, Akolat Zarband