पश्चिम प्रभागात शुकशुकाटच

By Admin | Updated: January 28, 2017 21:42 IST2017-01-28T21:42:43+5:302017-01-28T21:42:43+5:30

महापालिकेच्या पश्चिम प्रभागातील एकाही इच्छुक उमेदवाराने शनिवारी अर्ज दाखल केला नाही.

Shukshuktouch in West division | पश्चिम प्रभागात शुकशुकाटच

पश्चिम प्रभागात शुकशुकाटच



नाशिक : महापालिकेच्या पश्चिम प्रभागातील एकाही इच्छुक उमेदवाराने शनिवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे निवडणूक कार्यालयात शुकशुकाट होता.
महापालिकेच्या निवडणुकीला प्रारंभ झाला असून, शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पैकी पहिला दिवस निरंक गेला. दुसऱ्या दिवशी तरी कोणी उमेदवार अर्ज दाखल करेल, अशी अपेक्षा होती, मात्र तीही फोल ठरली. पश्चिम विभागात प्रभाग क्रमांकात सात, बारा आणि पंचवीस असे तीन प्रभाग असून, सर्व प्रभाग सुशिक्षित आहेत. तथापि, एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केले नाही. सर्वच पक्षांत उमेदवारीसाठी चुरस निर्माण असल्याने उमेदवारी यादी घोषित होण्याच्या आतच उमेदवारी अर्ज भरण्याचे टाळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांचे इच्छुक सोमवारी किंवा मंगळवारी अर्ज दाखल करतील, अशी शक्यता आहे.

Web Title: Shukshuktouch in West division