‘हर शख्स परेशान सा क्यों है?’; श्री श्री रविशंकर आज देणार उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 10:41 IST2020-06-20T03:08:59+5:302020-06-21T10:41:03+5:30
आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आध्यात्मिक गुरू ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते जगद्गुरू श्री श्री रविशंकर यांना ‘लोकमत’ने खास या चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.

‘हर शख्स परेशान सा क्यों है?’; श्री श्री रविशंकर आज देणार उत्तर
पुणे : ‘इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है..?’ - हा एका लोकप्रिय गाण्याने विचारलेला प्रश्न आजच्या संदर्भात थेट श्री श्री रविशंकर यांनाच विचारला, तर ते काय उत्तर देतील? गुरुदेवांनी दिलेले या प्रश्नाचे उत्तर ऐकण्याची एक प्रसन्न संधी आज रविवारी सायंकाळी ५.३० वाजता सर्वांना मिळू शकते.
निमित्त आहे ‘लोकमत माध्यम समूह’ व ‘द अऱ्हानाज रोझरी फाउंडेशन’तर्फे आयोजित केलेल्या ‘लोकमत योगायुग’ या विशेष वेबिनारचे! आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आध्यात्मिक गुरू ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते जगद्गुरू श्री श्री रविशंकर यांना ‘लोकमत’ने खास या चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.
गेले सुमारे तीन महिने कोरोनाच्या महामारीचा ताण सहन करणारे जग दाराआड कोंडले गेलेले आहे. कधी कल्पनाही केली नव्हती अशी अनिश्चितता आणि अडचणींचा सामना करणारी माणसे जेरीस आलेली आहेत. या तणावातून मनाला हलकेपणा देण्याचे सामर्थ्य आहे, ते योगाभ्यासात! श्वासाचे नियमन, प्राणायाम आणि योगाभ्यासाचे महत्त्व अवघ्या जगभर पोहोचवणारे श्री श्री रविशंकर या विशेष वेबिनारमध्ये मानसिक स्वास्थ्याशी संबंधित विविध प्रश्नांवर मुक्त संवाद साधणार आहेत. हे वेबिनार लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर आणि लोकमत फेसबूक पेजवर लाईव्ह पाहता येईल.