श्रावण सरींनी चिंब झाला श्रावण सोहळा; ‘लोकमत सखी मंच’चे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 02:37 PM2020-08-26T14:37:52+5:302020-08-26T14:39:26+5:30

डिजिटल सोहळ्याचा साक्षीदार झाला संपूर्ण महाराष्ट्र

shravan sohala organised by lokmat sakhi manch gets overwhelming response | श्रावण सरींनी चिंब झाला श्रावण सोहळा; ‘लोकमत सखी मंच’चे आयोजन

श्रावण सरींनी चिंब झाला श्रावण सोहळा; ‘लोकमत सखी मंच’चे आयोजन

googlenewsNext

औरंगाबाद : लोकमत सखी मंच श्रावण सोहळा प्रस्तुत पॉवर्ड बाय स्टार प्रवाह असोसिएट स्पॉन्सर जाई काजळ, संजय घोडावत ग्रुप स्टार उत्पादन आणि डॉ रिचाज् युनिक क्लिनिक. आयोजित श्रावण सोहळ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आजच्या समारोपीय सोहळ्यात सखींनी सहभागी होऊन आनंद लुटला. कार्यक्रमाची सुरुवात मुंबई येथील संस्कृती रंग माहीमच्या सखी ग्रुपने सादर केलेल्या मंगळागौरने झाली. कार्यक्रमाच्या असोसिएट पार्टनर असलेल्या डॉ. रिचाज् युनिक क्लिनिकच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. रिचा जैन यांनी सखींना त्वचेची काळजी कशी घ्यावी, यासंदर्भांत मार्गदर्शन केले. याप्रसंगी आॅनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.

स्टार प्रवाह उखाणा तिच्याकरिता संजय घोडावत ग्रुपतर्फे स्टार मिठाई मेळा, डॉ. रिचाज् युनिक क्लिनिकतर्फे बेस्ट स्किन सेल्फी, जाई काजळतर्फे सेल्फी या स्पर्धांचे राज्यस्तरीय विजेते घोषित करण्यात आले.

सखींसोबत साधला मान्यवरांनी संवाद
सुप्रसिद्ध गायिका डॉ. नेहा राजपाल यांच्या सुरेल गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. स्टार प्रवाहवर सुरू झालेल्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या नवीन मालिकेतील कलाकार जयदीप आणि गौरी यांना भेटण्याच्या संधीसोबत सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता, निर्देशक, पटकथा लेखक महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी मालिकेचे विविध पैलू उलगडून सांगितले.

सखींशी संवाद साधताना त्यांनी मालिकेबद्दल माहिती दिली. तब्बल दहा वर्षांनी टीव्ही मालिकेतून भेटायला येणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पाहण्यासाठी सखी आतुर होत्या. वर्षा उसगावकर यांनीही सर्वांशी मुक्त संवाद साधला.

मालिकेमध्ये कोल्हापुरी बाज असलेली भूमिका साकारायची असल्याने त्यासाठी मला विशेष मेहनत घ्यावी लागली असे यावेळी त्यांनी सांगितले. त्यांचे मूळ गाव असलेलं गोवा हे त्यांच्यासाठी सुख आहे, असं त्या म्हणाल्या आणि जाता जाता छानसा उखाणाही घेतला .

उखाणा तिच्याकरिता विजेते : प्रथम : विनिता सोनजे (औरंगाबाद),
द्वितीय : दीपा बाहेती (बीड) तृतीय : प्रियंका बोंब (पैठण)
उत्तेजनार्थ : औरंगाबाद जिल्हा - संगीता खरे, सुनीता करवा, प्रीती सोनजे, विशाखा देशपांडे, नीलम वाघमारे, अनुपमा भोंडवे. बीड जिल्हा - सुषमा भुसारी, संगीत स्वामी, सूचिता पोखरकर, शुभांगी आनंदगावकर.
सेल्फी विथ जाई काजळ विजेते : प्रथम : पुनम जाधव, द्वितीय : शीतल बाहेती, तृतीय : मनीषा तोष्णीवाल (परळी)
उत्तेजनार्थ : औरंगाबाद जिल्हा - नम्रता बिल्हारे, प्रतीक्षा लाड, अंजली शास्त्री, अश्विनी गायकवाड, नेहा उदावंत, अंबिका जोशी. जालना जिल्हा - पल्लवी राऊत. बीड जिल्हा - नीलिमा केंद्रे, प्रतिभा तांबट, संगीता सपकाळ
स्टार मिठाई मेळा विजेते : प्रथम : प्रीती चौधरी, द्वितीय : प्रवीणा उगले

Web Title: shravan sohala organised by lokmat sakhi manch gets overwhelming response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.