शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा, सबुरी... साईबाबांच्या छत्रछायेत भाजपची टॅगलाइन, आज अधिवेशन

By यदू जोशी | Updated: January 12, 2025 05:31 IST

‘श्रद्धा’वान कार्यकर्त्यांना नेते निवडून आणणार

- यदु जोशीशिर्डी : साईबाबांच्या शिर्डीनगरीत भाजपचे महाअधिवेशन आज, रविवारी होत असताना पक्षाने अनेक विषयांबाबत साईबाबांच्या शिकवणुकीनुसार ‘श्रद्धा व सबुरी’ची टॅगलाइन घेतल्याचे स्पष्ट झाले.  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देताना ही टॅगलाइन अधोरेखित केली. त्यातून, ‘महायुतीत तूर्तास नवीन पक्ष येणार नाही, विधानसभा निवडणुकीतील बंडखोरांना लगेच पक्षात घेतले जाणार नाही हे स्पष्ट झाले.

शरद पवार यांनी रा. स्व. संघाची प्रशंसा करणे, त्यांच्या पक्षातील खासदार अजित पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा, उद्धवसेनेच्या मुखपत्रात झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक आणि स्वबळावर लढण्याचे खा. संजय राऊत यांनी दिलेले संकेत या पार्श्वभूमीवर भाजप नवीन मित्रपक्ष जोडणार, मविआ फुटणार अशी चर्चा आहे. बावनकुळे म्हणाले की, तसे काही नाही. काँग्रेससोबत गेल्याने हिंदुत्वाचा आधार गेला, नुकसान झाले याची उपरती ठाकरे यांना झालेली दिसते. ‘ते’ नेते, नव्या मित्रपक्षांना सबुरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जागावाटपाआधी, ‘आपल्याला महायुतीसाठी त्याग करावा लागू शकतो, शेवटी श्रद्धा व सबुरी महत्त्वाची असते’, असे विधान केले होते.  मंत्रिपद न मिळालेल्या व अन्याय झाल्याचा सूर लावणाऱ्या बड्या नेत्यांनाही सबुरीचा सल्ला दिला जात आहे. 

अमित शाह आज मार्गदर्शन करणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रविवारी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतील तिन्ही पक्षांच्या ज्या नेत्यांनी बंडखोरी करून निवडणूक लढविली किंवा महाविकास आघाडीकडे गेले, अशांना महायुतीतील त्या-त्या पक्षात परत घेताना तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून एकमताने निर्णय घेतील. विधानसभा निवडणुकीत श्रद्धेने काम करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देणार. 

टॅग्स :BJPभाजपाshirdiशिर्डीMaharashtraमहाराष्ट्र