गणपती विसर्जनाच्या माध्यमातून भावी आमदारांच शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 10:20 AM2019-09-13T10:20:30+5:302019-09-13T10:38:58+5:30

गणपती बाप्पाच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत मतदारसंघातील महत्वाच्या मंडळांच्या ठिकाणी भावी आमदारांनी भेटी दिल्याचे पाहायला मिळाले.

Showed the power of future MLA in Ganpati Festival | गणपती विसर्जनाच्या माध्यमातून भावी आमदारांच शक्तिप्रदर्शन

गणपती विसर्जनाच्या माध्यमातून भावी आमदारांच शक्तिप्रदर्शन

Next

मुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली नसली तरीही भावी आमदारांनी अप्रत्यक्षरीत्या आपला प्रचार सुरु केला आहे. निवडणुका तोंडावर असल्याने मतदारसंघात स्वता:ची ताकद दाखवण्याची कोणतेही संधी इच्छुक उमेदवार सोडत नसल्याचे दिसून आले. गुरुवारी झालेल्या गणपती विसर्जनात सुद्धा विविध ठिकाणी भावी आमदारांच शक्तिप्रदर्शन पहायला मिळाले. मतदारसंघातील कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी ढोल पथक,लावण्या, ऑरकेस्ट्राचे आयोजन भावी आमदारांकडून करण्यात आले होते.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याची क्षणी लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर प्रत्येक मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भावी आमदारांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. तर इच्छूक उमेदवार मतदारसंघातील लग्न समारंभ, धर्मिक कार्यक्रम, उद्घाटनाच्या ठिकाणी न चुकता हजेरी लावताना दिसत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत मतदारसंघातील महत्वाच्या मंडळांच्या ठिकाणी भावी आमदारांनी भेटी दिल्याचे पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे गणपती विसर्जनावेळी भावी आमदार आप-आपल्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन करताना दिसून आले. कुठे लावण्यांच्या कार्यक्रमावर कार्यकर्त्यांसोबत थिरकताना, तर कुठे ढोल वाजवताना इच्छुक उमेदवार पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी ऑरकेस्ट्राच्या गाण्यातून 'भावी आमदार साहेब,भाऊ,दादाच ' असे आयकायला मिळत होते. एकाच मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवार असल्याने आप-आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला.

गणपती विसर्जन करताना मोठ्याप्रमाणात मिरवणूक काढण्यात येतात. यावेळी मिरवणुकीत राजकीय नेत्यांची उपस्थितीती सुद्धा लक्षवेधी ठरली. विद्यामान व भावी आमदार सकाळपासूनच मतदारसंघातील विविध मंडळांना भेटी देत असल्याचे पाहायला मिळाले. तर बऱ्याच ठिकाणी बप्पाच्या निरोपासाठी त्यांच्याकडून ढोल पथक, ऑरकेस्ट्राचे आयोजन करून देण्यात आले असल्याचे सुद्धा दिसून आले. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भावी आमदारांनी गणपती विसर्जनातून एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केलं म्हंटले तर चुकीचं ठरणार नाही.

 

 

 

 

Web Title: Showed the power of future MLA in Ganpati Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.