शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

डांबराचा खर्च अर्धाच दाखवा आणि चांगल्या बातम्यांसाठी पत्रकारांना ‘मॅनेज’ करा - बांधकाममंत्र्यांची अशीही खड्डेमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 5:25 AM

राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्यासाठी अतिरिक्त डांबर लागणार आहे. मात्र डांबराचा अर्धाच खर्च कागदावर दाखवा आणि चांगल्या बातम्यांसाठी पत्रकारांना ‘मॅनेज’ करा, असा अजब सल्ला

सुशील देवकरजळगाव : राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्यासाठी अतिरिक्त डांबर लागणार आहे. मात्र डांबराचा अर्धाच खर्च कागदावर दाखवा आणि चांगल्या बातम्यांसाठी पत्रकारांना ‘मॅनेज’ करा, असा अजब सल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्याने अधिकारी आश्चर्यचकित झाले!राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी बांधकाम मंत्री पाटील प्रत्येक जिल्ह्यात बांधकाम विभागाच्या अधिकाºयांच्या बैठका घेत आहेत. गुरुवारी जळगाव जिल्ह्याची बैठक झाली. शाखा अभियंतापासून तर अधीक्षक अभियंता दर्जाच्या अधिकाºयांची या बैठकीला उपस्थिती होती. खड्डेमुक्त अभियान गतीने मार्गी लावण्यासोबतच टीका टाळण्यासाठी चार युक्तीच्या (?) गोष्टीही त्यांनी अधिकाºयांना सांगितल्या. ते म्हणाले, खड्डे (पॉट होल) बुजवण्यासाठी मशिन घेतले आहे. मात्र त्याला नियमित कामापेक्षा दुप्पट डांबर लागते. अतिरिक्त डांबर वापरल्यावरून टीका होऊ शकते. त्यामुळे डांबराचा निम्मा खर्च अदृश्य करा आणि जो खर्च सर्वसाधारण तंत्राला लागतो, तेवढाच पेपरवर घ्या, असा कानमंत्रही त्यांनी दिला.रस्त्यांच्या बांधकामासंदर्भात शासन निर्णयांमध्ये सतत बदल होत असल्याने येणाºया अडचणी काही अधिकाºयांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावरही मंत्री पाटील यांनी ‘बौद्धिक’ घेतले.पाऊस पडला की खड्डे पडणारचमहाराष्टÑातील रस्त्यांचा बेस तयार झालाच नाही. कारण पूर्वी ८०० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद असायची. हळूहळू ती १२०० कोटींवर व आता ४ हजार कोटींवर आली आहे. पाऊस पडला की खड्डे पडतातच. खड्डे बुजविण्याएवढेच हे बजेट असते. मात्र अचानक खड्डे झाले, असे भासवून सरकारला घेरण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र मी अशा आरोपांना पुरून उरतो, असा दावाही बांधकाममंत्र्यांनी केला.सुप्रिया सुळेंना सध्या भरपूर रिकामा वेळराष्टÑवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच त्यांच्या मतदारसंघातील एका खड्ड्याचा सेल्फी काढून सोशल साईटवर टाकला. वृत्तपत्रातूनही तो गाजला. त्याचा उल्लेख करीत चंद्रकांतदादा म्हणाले, सध्या त्यांचे सरकार नसल्याने त्यांना भरपूर वेळ आहे, त्यामुळे त्यांनी खड्ड्याचा सेल्फी काढून व्हायरल केला. आम्हीपण त्यांच्या मतदारसंघातील दुरुस्त केलेले २८ फोटो काढून भरलेले खड्डे दाखविले. अजून एखादा खड्डा राहिला असेल तर कळवा, असे सांगितले. त्यांनी त्यावर धन्यवाद दिले. आम्ही स्वागत आहे, म्हणून त्यांचे तोंड बंद केले.चांगल्या बातम्या ‘मॅनेज’ कराराज्यातील विरोधक निष्प्रभ झाले असल्यामुळे पत्रकारच विरोधकांची भूमिका पार पाडत आहेत. वर्तमानपत्रातील टीका टाळण्यासाठी चांगल्या बातम्या ‘मॅनेज’ करण्याचा सल्लाही बांधकाममंत्र्यांनी या बैठकीत अधिकाºयांना दिला.पूर्वी अर्धा ते १ किमी लांबीचे खड्डे दुरुस्तीचे टेंडर काढले जात होते व खड्डे न भरताच बिलही काढायची सवय होती. आम्ही १० किमीच्या खाली असे टेंडर काढता येणार नाही, असा नियम केला. त्यामुळे कंत्राटदारांची गोची झाली. वेळ पडली तर मी स्वत: फावडा,टोपली घेऊन रस्त्यांचे खड्डेबुजवायला रस्त्यावर उतरेन. मात्र नियमात बदल करू देणार नाही.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा