शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"जगावं की मरावं, की जावं हे राज्य सोडून? पीओकेमध्ये नेऊन सोडण्याची सोय करा"; सुरेश धस विधानसभेत कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 14:52 IST

Suresh Dhas News : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीक विमा घोटाळ्याकडे सरकारचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या नावावर दुसऱ्याच लोकांनी पैसे लाटल्याचे सांगत शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं, असा रोकडा सवाल सरकारला केला. 

Suresh Dhas Latest News : पीक विमा योजनेवरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सरकारला धारेवर धरले. "२०२०, २०२३ चा पीक विमा मिळालेला नाही. आणि राज्यात काय चाललंय? मी आमदारकीबरोबर ऊसतोड मजूरांचं काम करतो. सभागृहात बंजारा समाजाचा आमदार बसलेला असेल. माझ्या माहितीप्रमाणे बंजारा समाजात चार-पाचच आडनावं आहेत. रामापूर तांड्यावरून ४००० हेक्टरचा विमा भरला गेलाय. तांड्याचा एरिया ४००० हेक्टरचा असतो का? मला कुणीतरी सांगा. कुणाच्या तरी पायातील बूट काढा आणि माझ्या तोंडात मारा", असे म्हणत आमदार सुरेश धस विधानसभेत कडाडले. 

'पीक विम्याचा परळी पॅटर्न', असा उल्लेख करत सुरेश धस यांनी महायुतीच्या मागच्या सरकारमधील कृषिमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. "रामपूर तांड्यावरील ज्यांनी विमा भरलाय त्यांची नावं सांगतो. गुट्टे, कुट्टे,  होळंबे, कराड, दहिफळे, जयस्वाल बंजारा समाजात जयस्वाल आडनाव कुठून आलं मला काही कळेना? गुट्टे कधी आलं? दहिफळे बंजारा कधी झाले? मला काही कळेना?", असा सवाल धस यांनी उपस्थित केला. 

 "आंधळे, मुंडे, लटपटे, चिखलबिडे, केंद्रे... ही आडनाव बंजारा समाजात कधी आले? बंजारा समाजात पाच आडनावंच आहेत. एका गावात चार हजार हेक्टरचा विमा भरला गेलाय. २०२४ वर्षाचा. आमच्या तालुक्यातील लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कसे काय भरू शकतात? माझ नाव खामगाव चिखलीला आल्यावर कसं जमेल?", असे धस म्हणाले. 

"परळीचा पॅटर्न लवकर लागू करावा म्हणून मोदी, शाहांना भेटणार"

"मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणार आहे की, पंतप्रधान पीक विमा योजनेत देशातील कोणत्याही सातबाऱ्यावर कोणीही नावे टाकू द्यायची. एकट्या सोनपेठ तालुक्यात १३ हजार १९० हेक्टरचा बोगस पीक विमा भरला गेला आहे. परळीचा हा नवीन पॅटर्न आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा परळी पॅटर्न. हा पॅटर्न सगळीकडे लागू करावा, अशी विनंती मी देशाच्या पंतप्रधानांकडे करणार आहे. लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित शाहांची आणि पंतप्रधानांची. हा जो परळीचा पॅटर्न आहे, तो सगळ्यात आधी गुजरातमध्ये लागू करावा आणि वाराणसीतही लागू करा अशी विनंती करणार", असे म्हणत सुरेश धस यांनी नामोल्लेख न करता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. 

"काय चाललंय? गरीब शेतकरी पैसा भरतोय. आम्हीच घोषणा केली की, १ रुपयात पीक विमा. वाजवा ढोल. घ्या ढोल. एक रुपयात विमा, परळी पॅटर्न. राज्याचे कृषिमंत्री कोण, मला त्यांचं नाव माहिती नाही. मी नाव घेणार नाही. २०२३-२४ चे कृषिमंत्री. २०२३ मध्ये थोडं साधलं. बीड जिल्ह्याचा आकडा सांगितला मी २०२३ चा, ७००० हेक्टरचा. धाराशिव जिल्ह्यात ३००० हेक्टरवर गुन्हे दाखल झाले आहेत", असे धस यांनी विधानसभेत सांगितले.

"आम्हाला पीओकेमध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा" 

"हे काय चाललंय. धाराशिव जिल्ह्यात भरलेला ३००० हेक्टरचा विमा, सगळे शेतकरी परळी तालुक्यातील आहेत. माझ्या मतदारसंघात कासेवाडी आंबेवाडी गाव आहे. त्या गावाला महसूली दर्जाच नाही, तिथून ४००० हेक्टरचा विमा भरला गेलाय. आपल्या शेजारचे पॅटर्नवाले. परभणी जिल्ह्यातून ४० हजार हेक्टरचा बोगस विमा भरला गेला आहे. आता जगावं की मरावं, की जावं हे राज्य सोडून? आम्हाला पीओकेमध्ये (पाकव्याप्त काश्मीर) नेऊन सोडायची तरी सोय करा", अशा शब्दात सुरेश धसांनी माजी कृषिमंत्र्यांवर घणाघात केला. सुरेश धस यांनी यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. 

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसDhananjay Mundeधनंजय मुंडेCrop Insuranceपीक विमाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती