मराठा आरक्षणावर लवकरच बैठक : चंद्रकांत पाटील
By Admin | Updated: April 22, 2017 01:34 IST2017-04-22T01:34:21+5:302017-04-22T01:34:21+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर सरकार गंभीर आहे. कोल्हापूर येथील महागोलमेज परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात समाजाच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा झाली.

मराठा आरक्षणावर लवकरच बैठक : चंद्रकांत पाटील
जळगाव : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर सरकार गंभीर आहे. कोल्हापूर येथील महागोलमेज परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात समाजाच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा झाली. सरकारशी चर्चेची त्यांची तयारी असून, पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसमवेत या प्रतिनिधींची बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी वकिलांची टीम कार्यरत असून, सुमारे २७०० पानांचे पुरावे सरकारने तयार केले आहेत. परिषदेची सरकारनेही गांभीर्याने घेतली आहे, असेही पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)