सात वर्षीय बालिकेवर दुकानदाराचा अतिप्रसंग

By Admin | Updated: June 5, 2017 20:21 IST2017-06-05T20:21:52+5:302017-06-05T20:21:52+5:30

चॉकलेट आणण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय बालिकेवर दुकानदार तरूणानेच अतिप्रसंग केल्याची खळबळजनक घटना वळदगाव येथे

Shopper's overcompetence at a seven-year-old child | सात वर्षीय बालिकेवर दुकानदाराचा अतिप्रसंग

सात वर्षीय बालिकेवर दुकानदाराचा अतिप्रसंग

>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 5 - चॉकलेट आणण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय बालिकेवर दुकानदार तरूणानेच अतिप्रसंग केल्याची खळबळजनक घटना वळदगाव येथे ५ जून रोजी सकाळी ११.५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर आरोपी पसार झाला असून त्याच्याविरूद्ध सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
 
अजय रमेश बनसोडे(२०,रा.वळदगाव)असे नराधम आरोपीचे नाव आहे. याविषयी सातारा पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिलेची ७ वर्षीय चिमुकली आज सोमवारी सकाळी ११.५ वाजेच्या सुमारास गावातील किराणा दुकानात चॉकलेट आणण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी अजय हा दुकानात एकटाच होता. याप्रसंगी त्याने पीडितेला दुकानात बोलावून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडिताच रडतच घरी गेली. यावेळी चिमुकलीने रडतच तिच्यासोबत झालेल्या अत्यााचाराची माहिती तिच्या आईला दिली. या घटनेनंतर पीडितेचे नातेवाईक आरोपीच्या दुकानाकडे गेले असता तो दूकान बंद करून पळून गेल्याचे त्यांना दिसले. या घटनेनंतर त्यांनी लगेच सातारा ठाण्यात धाव घेतली आणि पीडितेच्या मातेने आरोपीविरूद्ध फिर्याद नोंदविली. पोलिसांनी नराधम अजयविरूद्ध बलात्कार आणि बाललैैगिक अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली. पोलीस उपनिरीक्षक सुशीला खरात यांच्या पथकाकडे या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला. पोलिसांनी युद्धपातळीवर आरोपीचा शोध सुरू केला आहे. तो रात्री उशीरापर्यंत पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

Web Title: Shopper's overcompetence at a seven-year-old child