प्लास्टिक आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द; पर्यावरण मंत्र्यांच्या आढावा बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 03:11 IST2018-10-10T02:45:28+5:302018-10-10T03:11:07+5:30
कोणत्याही दुकानात कॅरी बॅग, प्लास्टिकच्या वस्तू अथवा प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियल आढळल्यास तातडीने दुकानाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या प्लास्टिक बंदीबाबत आढावा बैठकीत हे आदेश दिले.

प्लास्टिक आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द; पर्यावरण मंत्र्यांच्या आढावा बैठकीत निर्णय
मुंबई : कोणत्याही दुकानात कॅरी बॅग, प्लास्टिकच्या वस्तू अथवा प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियल आढळल्यास तातडीने दुकानाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या प्लास्टिक बंदीबाबत आढावा बैठकीत हे आदेश दिले.
राज्यात ई-कॉमर्ससाठी लागणाऱ्या प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियलला तीन महिन्यांसाठी विक्री करण्यास मुभा दिली होती. ती मुदत संपल्याने दुकानदारांनी आता पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा. आतापर्यंत राज्यात २९० टन प्लास्टिक जप्त केले आहे. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक येत आहे. पर्यटन व देवस्थानांमध्ये प्लास्टिक कॅरीबॅग मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात, अशी माहिती कदम यांनी दिली. राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील उपस्थित होते.
प्लास्टिक बंदीसंदर्भात सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी तसेच माहुल (आरसीएफ) परिसरातील वाढत्या प्रदूषणातून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री कदम यांची मंत्रालयात भेट घेतली.