धक्कादायक ! विरारहून नालासोपा-याला चाललेल्या तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 15:05 IST2017-09-08T14:21:35+5:302017-09-08T15:05:28+5:30
वसई, दि. 8 - विरार स्टेशनवर धावत्या लोकलमधून तरुणीला खाली ढकलण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोमल चव्हाण (19) ...

धक्कादायक ! विरारहून नालासोपा-याला चाललेल्या तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलले
वसई, दि. 8 - विरार स्टेशनवर धावत्या लोकलमधून तरुणीला खाली ढकलण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोमल चव्हाण (19) असे या तरूणीचे नाव आहे. कोमल यात जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने प्लॅटफॉर्मवरच पडल्याने ती बचावली.
कोमल गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताची लोकल पकडून विरारहून नालासोपा-याला घरी चालली होती. त्यावेळी महिलांच्या डब्ब्यात ती एकटीच होती. पोलीस कर्मचारी देखील नव्हता. गाडी सुटल्यावर एक इसम डब्ब्यात शिरला. तो कोमलकडे पैसे मागू लागला. पैशासाठी तो इसम जवळ येऊ लागल्याने कोमल घाबरून दरवाज्याच्या दिशेने धावली. पण गाडी सुटली होती. गाडीने वेग पकडताच त्या इसमाने कोमलला गाडीतून बाहेर ढकलून दिले. त्यामुळे कोमल प्लॅटफॉर्मवर पडून जखमी झाली. सुदैवाने गाडी प्लॅटफॉर्मवर होती आणि तिचा वेग अधिक नसल्याने कोमल थोडक्यात बचावली.
कोमल पाठोपाठ सदर व्यक्ती धावत्या गाडीतून उतरून पसार झाली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.