धक्कादायक! कल्याणमध्ये प्राध्यापक पतीने केली पत्नीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 19:46 IST2017-09-09T16:53:53+5:302017-09-09T19:46:12+5:30
कल्याणच्या लोकग्राम परिसरात प्राध्यापक पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
_201707279.jpg)
धक्कादायक! कल्याणमध्ये प्राध्यापक पतीने केली पत्नीची हत्या
कल्याण, दि. 9 - लोकग्राम परिसरातील शरयू सोसायटीत राहणाऱ्या एका प्राध्यापकानेे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.विद्या तेली असे मृत महिलेचे नाव असूनतीचा पती संजय तेली हा घाटकोपर येथील झुंझुंवाला महाविद्यालयात प्राध्यापक आहे.
पत्नीच्या हत्ये नंतर पती संजयने देखील दोन्ही हातांच्या नसा आणि गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. पत्नीची हत्या झाल्यानंतर संजयने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सून सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून कल्याणच्या मेट्रो रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीसानी दिली.
तेली यास दोन मुले असून ते अभियांत्रिकी शिक्षण घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्या झाल्यानंतर आणि वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर काही वेळाने एक मुलगा घरी आला, तेव्हा आई मयत झाली असून वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याचे त्याने बघितले. त्या घटनेमुळे भयभीत होऊन त्याने आरडाओरडा केला, आणि वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. अनेक वर्षांपासून ते कल्याणमध्ये वास्तव्याला असल्याचे सांगण्यात आले.