शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक घटना : भूत दिसत असल्याचे सांगत आठव्या मजल्यावरून उडी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 20:57 IST

मद्यपान केल्यानंतर भूत दिसत असल्याचे सांगत आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.

पुणे : मद्यपान केल्यानंतर भूत दिसत असल्याचे सांगत आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.ही घटना मंगळवार  (दि.१८) रात्री  साडेदहाच्या सुमारास लोहगाव येतील जिनीबेलीना सोसायटीमध्ये घडली.

                 अर्णव तुहीनेनदूर मुखोपाध्याय (वय 36, जिनीबेलीना सोसायटी लोहगाव) असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान अर्णव यांनी मृत्यपूर्वी कबुतराच्या तब्बल आठ अंड्यांचे सेवन केल्याचे समोर आले आहे.                                या घटनेविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ कोलकत्याचे रहिवासी असलेले अर्णव मुखोपाध्याय हे एका सेल्यूलर कंपनीमध्ये नोकरी करत होते. ते लोहगाव पत्नीसह राहतात. त्यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबानुसार मागील दोन दिवसांपासून ते तणावाखाली होते.मंगळवारी घरात मद्यप्राशन केले होते. कबुतराच्या अंड्यांचे ऑम्लेट खाल्ल्यामुळे त्यांनी अचानक मला भूत दिसत असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर घरात आरडाओरडा करत त्यांनी हातात सूरी घेऊन त्या भुताचा पाठलाग सुरु केला.त्यांच्या आक्रमक पवित्र्याला पत्नी आवरण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्यांनी गॅलरीचा दरवाजा उघडला आणि खाली उडी मारली. ही उडी इतकी उंचावरून होती की ते खाली उभ्या असलेल्या चारचाकीवर धडकून जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला असून आत्महत्येची नोंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसLohgaonलोहगावSuicideआत्महत्या