शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

धक्कादायक ! पोलीस कोठडीत आजारपणामुळे होताहेत आरोपींचे सर्वाधिक मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 16:45 IST

आजारपणामुळे पोलीस कोठडीतील मृत्यू टाळण्यासाठी दर ४८ तासांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी करावी..

ठळक मुद्देपोलीस कोठडीतील मृत्यु रोखण्यासाठी सीआयडीच्या मार्गदर्शक सूचनाआरोपीचा संशयास्पद मृत्यु झाल्यास मारहाणीचे आरोप होतात.

पुणे : पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचा मृत्यु हा आत्महत्या किंवा त्याचा नैसर्गिक मृत्यू असला तरी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर व पोलिसांच्या कार्यपद्धतीविरुद्ध टीकेची झोड उठविली जाते. आरोपी पोलीस कोठडीत असताना आजारपणामुळे सर्वाधिक मृत्यू झाले असून ते टाळण्यासाठी सीआयडीने राज्यभरातील सर्व पोलीस प्रमुखांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

'नॅशनल क्राईम रेक्रार्ड ब्युरो' च्या नोंदीनुसार २०१८ मध्ये महाराष्ट्रात पोलीस कोठडीतील एकूण मृत्युपैकी ५ मृत्यू आजारपणामुळे झाले होते.  तर, आत्महत्येमुळे एकाचा तर एकाचा मारहाणीमुळे मृत्यू झाला होता. पोलीस कोठडी घेतलेली नसतानाही पोलिसांच्या लॉकअपमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता. हे प्रकार टाळण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आरोपीला अटक करताना पंचनाम्यात आरोपीच्या बाह्य अंग, शरीरावरील जखमांचा तपशील नमूद करावा. वैद्यकीयदृष्ट्या फीट असेल तरच पोलीस कोठडी घ्यावी. कोठडीत ठेवण्यापूर्वी आरोपीच्या अंगझडतीत त्याच्याकडे हत्यार, विषारी पदार्थ, दोरी, ब्लेड, काडी पेटी, चाकू यासारख्या वस्तू बारकाईने शोधाव्यात.  तपास पूर्ण झाला असल्यास पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्यास अटक आरोपीचे रिमांड घेणे टाळावे. जामीनपात्र गुन्ह्यात आरोपीस अटक केल्यानंतर विनाकारण कोठडीत न ठेवता जामीनावर मुक्त करावे. नागरिकांनी आरोपीला मारहाण केल्यानंतर लोक आरोपीला पोलीस ठाण्यात हजर करतात. अशा प्रसंगी आरोपीला तात्काळ रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करावे. आरोपी पूर्ण होईपर्यंत वैद्यकीय कोठडी घ्यावी. पोलीस कोठडीतील मृत्यु या विषयाबाबत पोलिसांची संवेदनक्षमता विकसित करण्यासाठी किमान ३ ते ४ वर्षाच्या अंतराने पोलिसांना प्रशिक्षण देण्यात यावे. 

मागील काही वर्षात राज्यात पोलीस कोठडीतील मृत्युंचे प्रामुख्याने ३ प्रकार आढळून आले आहेत. १) आरोपीचा आजारपणामुळे मृत्यू २) आरोपीने आत्महत्या केल्यामुळे मृत्यू३) आरोपीचा संशयास्पद मृत्यू

 आजारपणामुळे पोलीस कोठडीतील मृत्यू टाळण्यासाठी दर ४८ तासांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी करावी. आरोपी आजारी असल्यास वेळेवर औषधोपचार केल्यास आरोपी ज्या कोठडीत असेल तेथील सहआरोपी पोलिसांविरुद्ध तक्रार करणार नाहीत.तसेच पोलिसांना हलगर्जीपणा केल्याच्या आरोपाला सामोरे जावे लागणार नाही. 

आरोपीने शौचालयामध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचे अनेक प्रकरणात दिसून आले आहे. पहाऱ्यावरील अंमलदारांनी आरोपीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास हा प्रकार थांबविता येणे शक्य आहे. 

आरोपीचा संशयास्पद मृत्यु झाल्यास मारहाणीचे आरोप होतात. मृत्यु झालेल्या आरोपीच्या अंगावरील जखमांच्या खुणा जरी अटक करण्यापूर्वीच्या असल्या तरी त्याला पोलिसांनी मारहाण केल्यामुळे मृत्यु झाल्याचा आरोप होतो. पोलीस कोठडीतील आरोपीस मारहाण करु नये याबाबत अनेक परिपत्रकांद्वारे सूचित करण्यात आले असले तरी त्यांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. अटक करताना त्याच्या अंगावर प्राणघातक जखमा आहेत याची तपासणी करावी, अशा अनेक सूचना सीआयडीने दिल्या आहेत.  

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसDeathमृत्यू