शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

धक्कादायक; लग्न का केलं नाही म्हणून मुलाने केला आईचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:37 IST

सोलापूर : आईने माझे लग्न केले नाही म्हणून मी तिचा केबलच्या वायरने गळा आवळून खून केला, अशी कबुली देणाºया ...

ठळक मुद्देमोहित विजयकुमार कायत (वय २७, रा. जोडभावी पेठ, विकास लॉजच्या पाठीमागे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव वडिलाने मोहित याला काय झाले? असे विचारले असता त्याने आई माझे लग्न करीत नसल्याने मी तिचा केबलच्या वायरने गळा आवळला असे सांगितले.

सोलापूर : आईने माझे लग्न केले नाही म्हणून मी तिचा केबलच्या वायरने गळा आवळून खून केला, अशी कबुली देणाºया पोटच्या मुलास जोडभावी पेठ पोलिसांनी अटक केली. हा प्रकार सोमवारी घडला. 

मोहित विजयकुमार कायत (वय २७, रा. जोडभावी पेठ, विकास लॉजच्या पाठीमागे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विजयकुमार मोतीलाल कायत (वय ५६, रा. श्रीराम समर्थ निवास, सुरभि कॉलनी आपटे सोसायटी रोड, वारजे माळवाडी, पुणे सध्या जोडभावी पेठ विकास लॉजच्या पाठीमागे, सोलापूर) हे पत्नी नागमणी विजयकुमार कायत (वय ५२), मुलगा रोहित कायत (वय २९), मोहित कायत (वय २७) यांच्यासमवेत पुणे येथे राहत होते. मुलगा रोहित याचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता, तो नोकरीला असल्याने सर्वजण पुण्यात राहत होते. विजयकुमार कायत हे पत्नी नागमणी यांच्यासोबत भाऊ लक्ष्मीकांत कायत यांच्या सोलापुरातील घरी आले होते. 

मोहित कायत हा पुण्यात डिलेव्हरीचे काम करीत होता़ ७ मे रोजी सायंकाळी ८ वाजता तो सोलापुरात लक्ष्मण कायत यांच्या घरी आला. वडिलांनी विचारणा केली असता, त्याने मला खूप त्रास होत आहे, मी मरतो माझे लग्न करा, असे म्हणाला. मोहित याला मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याने वडिलांनी सम्राट चौकातील खासगी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले. ९ मे रोजी दुपारी ४ वाजता मोहित याला डिस्चार्ज देण्यात आला. १२ मे रोजी रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेले. सकाळी ६.४५ वाजता मोहित घरासमोर बसला होता. भावजय रोहिणी आरडाओरड करू लागली. विजयकुमार कायत यांनी घरात जाऊन पाहिले असता पत्नी नागमणी कायत ही बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे सांगितले. वडिलाने मोहित याला काय झाले? असे विचारले असता त्याने आई माझे लग्न करीत नसल्याने मी तिचा केबलच्या वायरने गळा आवळला असे सांगितले. विजयकुमार कायत यांनी फिर्याद दिली आहे. 

मोहित याला होते गांजाचे व्यसन...- मोहित कायत याला गांजा पिण्याची सवय होती. तो गांजा या मादक पदार्थाच्या आहारी गेला होता, मागील एक महिन्यापासून त्याने गांजा पिणे सोडून दिले होते. गांजा सोडल्याने त्याला शारीरिक व मानसिक त्रास होत होता. त्याचे लग्न होत नसल्याने, तो मरायची भाषा करीत होता. स्वत: मरण्याऐवजी त्याने निष्पाप आईचा गळा आवळून खून केला. या प्रकारामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात होती. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसmarriageलग्न