धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

By नारायण बडगुजर | Updated: July 21, 2025 21:06 IST2025-07-21T21:00:37+5:302025-07-21T21:06:51+5:30

Crime News: 'हनी ट्रॅप'सह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात बलात्कार प्रकरणी आणखी एक गुन्हा बावधन पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

Shocking! A case of rape has also been registered against Praful Lodha at Bavdhan police station. | धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

- नारायण बडगुजर 
 पिंपरी - 'हनी ट्रॅप'सह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात बलात्कार प्रकरणी आणखी एक गुन्हा बावधन पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

प्रफुल्ल लोढा (वय ६२, रा. जामनेर, जि. जळगाव) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. प्रफुल्ल लोढावर मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात नोकरीचे आमिष दाखवून एका १६ वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलींचे अश्लील छायाचित्र काढून, मुलींना डांबून ठेवून त्यांना धमकविल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. ३ जुलै रोजी साकीनाका पोलिस ठाण्यात पोस्को, बलात्कार, खंडणी, फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तर, १४ जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात 'पोक्सो'सह बलात्कार आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साकीनाका पोलिसांनी लोढा याला ५ जुलै रोजी अटक केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लोढा हा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप रविवारी (दि. २०) केला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली असतानाच आता प्रफुल्ल लोढा याच्यावर पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत बावधन पोलिस ठाण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोथरूड येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

संशयित लोढा याने फिर्यादी यांना तुमच्या पतीला नोकरी लावतो, असे सांगून त्यांना २७ मे २०२५ रोजी रात्री आठ वाजता बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये बोलवले. फिर्यादीस तुझ्या पतीला नोकरी लावायची असेल तर त्याबदल्यात मला तुझ्याशी शरीरसंबंध ठेवायला दे, असे म्हणाला. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला असता तुझीही नोकरी घालवेन, अशी धमकी दिली आणि जबरदस्तीने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पीडित महिलेने १७ जुलै रोजी बावधन पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. 

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, लोढा याच्यावर बलात्कार व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोढा सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. मुंबई पोलिसांकडून त्याचा ताबा घेतला जाणार आहे. -अनिल विभुते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन

Web Title: Shocking! A case of rape has also been registered against Praful Lodha at Bavdhan police station.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.