शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नाशिकमध्ये 177 कोटींचा धान्य घोटाळा, ईडीने केली तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 06:38 IST

177 crore grain scam in Nashik : या तिघांनी रेशन दुकानातील सुमारे १७७ कोटी रुपयांच्या ३० हजार क्विंटल धान्याची काळ्या बाजारात विक्री केल्याची माहिती पुढे आली आहे.

नागपूर : सक्त वसुली संचालनालयाच्या नागपूर येथील अधिकाऱ्यांनी काळा पैसा प्रतिबंधक कारवाई अंतर्गत घोरपडे बंधूंना अटक केल्याने सहा वर्षांपूर्वीच्या धान्य घोटाळ्याच्या प्रकरणाला उजाळा मिळाला आहे. संपत नामदेव घोरपडे, अरुण नामदेव घोरपडे आणि विश्वास नामदेव घोरपडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनी रेशन दुकानातील सुमारे १७७ कोटी रुपयांच्या ३० हजार क्विंटल धान्याची काळ्या बाजारात विक्री केल्याची माहिती पुढे आली आहे.२०१५ मध्ये हा घोटाळा उघड झाला होता. नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यात मनमाडमध्ये अन्न महामंडळाचे गोदाम असून, तेथे येणारा माल नाशिक जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील रेशन गोदामांमध्ये पोहोचविण्यासाठी वाहतूक ठेकेदार म्हणून घोरपडे काम करीत होते. मनमाड येथील या गोदामामधील काही अधिकारी आणि हमालांना हाताशी धरून आलेल्या धान्य पोत्यांतील माल गायब करण्याचे काम ही मंडळी करीत होती. त्यामुळे रेशन दुकानांसाठी बांधलेल्या तालुक्यांच्या स्तरावरील गोदामांमध्ये माल पोहोचत नव्हता. मात्र त्यानंतरही सारे आलबेल सुरू होते. राज्य शासनाच्या एका पथकाने सुरगाणा येथे अचानक गोदामाला भेट दिली तेव्हा तेथील गोदामात ३० हजार क्विंटल धान्य कागदोपत्री दिसत होेते; परंतु प्रत्यक्षात तेथे उंदीर फिरत होते. त्यामुळे त्यांनी त्याचा शोध सुरू केल्यानंतर एकेक कंगोरे उलगडत गेले.नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणचे धान्य गोदामात आलेला माल तपासण्यासाठी जबाबदारी वेगवेगळ्या तालुक्यातील तहसीलदारांवर होती. त्यामुळे खरी माहिती कळेल अशी शासनाची व्यवस्था होती. परंतु प्रत्यक्षात हे तहसीलदार गोदाम तपासणीसाठी कधीच जात नव्हते असे आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते.

धान्य माफियांवर मोक्का याच काळात सिन्नर येथील गोदामामधील धान्य वाडीवऱ्हे येथे घोटी-सिन्नरमार्गे नेत असताना पोलिसांनी एक टेम्पाे पकडला. हा टेम्पो घोरपडे यांच्या मालकीचा असल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी मग अधिक खोलाने कारवाई सुरू केली. त्यानंतर राज्य विधिमंडळात हा विषय गाजला. त्यावेळी धान्य माफियांवर मोक्का लावण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार कारवाई देखील झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी