शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: वाढदिवसाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंना धक्का! शिवसेना जिल्हाप्रमुख शिंदे गटात; पक्ष सोडला नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 10:21 IST

Maharashtra Political Crisis: विकासकामांसाठी पाठिंबा दिला असून, नाराज नाही. शिवसेनेतच आहे, असे यावेळी ते म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

सातारा: शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जात असून आता साताऱ्याचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनीही शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. मी शिवसेनेतच असून पक्ष सोडलेला नाही. शिंदे हे जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने विकासकामे होण्यासाठी मी त्यांना पाठिंबा देत आहे, असे जाधव यांनी सांगितले.  

मागील महिन्यात विधान परिषद निवडणूक झाली होती. त्यानंतर शिवसेनेचे नेते असणारे एकनाथ शिंदे पक्षातील आणि अपक्ष आमदारांसह गुवाहाटीत गेले होते. त्यानंतर आल्यावर त्यांनी भाजपच्या साथीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घडामोडीत मुख्यमंत्री शिंदे यांना शिवसेनेतून पाठिंबा वाढत चालला आहे. अनेक जण त्यांच्या गटात सामील होत आहेत. सातारा जिल्ह्यातील  काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. 

असे असतानाच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला हा एक मोठा धक्का बसणार आहे. चंद्रकांत जाधव हे अनेक वर्षांपासून शिवसेनेत आहेत. त्यांनी उपजिल्हाप्रमुखपदही भूषविले आहे.  त्या काळातील त्यांची आंदोलने गाजली होती. सध्या त्यांच्याकडे जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद होते. त्यांनी पक्ष वाढीसाठी मोठे काम केले आहे. आता त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिल्याने त्यांच्याबरोबर आणखी काही पदाधिकारीही जाण्याची शक्यता आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाची ताकद कमी होणार आहे. 

दरम्यान, चंद्रकांत जाधव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे दैवत तर उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेतृत्व नाही. शिवसैनिकांसारखे जीवाभावाचे मित्र नाहीत. परंतु सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत म्हणून त्यांना पाठिंबा देत आहे. जिल्ह्यात भरीव विकासकामे व्हावीत म्हणून मी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर मी कोणावरही नाराज नाही. मी शिवसेनेतच आहे, पक्षही सोडला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSatara areaसातारा परिसर