पाक संघाच्या दौऱ्याला शिवसेनेचा विरोध

By Admin | Updated: March 13, 2016 04:47 IST2016-03-13T04:47:54+5:302016-03-13T04:47:54+5:30

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारतदौऱ्याला शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. खेळाडूंसोबत दहशतवादी पाठविण्यात येत असतील तर त्याला आपला विरोध आहे.

Shivsena's opposition to the tour of Pakistan | पाक संघाच्या दौऱ्याला शिवसेनेचा विरोध

पाक संघाच्या दौऱ्याला शिवसेनेचा विरोध

भद्रावती (चंद्रपूर) : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारतदौऱ्याला शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. खेळाडूंसोबत दहशतवादी पाठविण्यात येत असतील तर त्याला आपला विरोध आहे. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंना खेळण्यास परवानगी दिली नाही. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करतो, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी ते म्हणाले की, माझा खेळाला विरोध नाही. पण खेळाच्या आडून जो देशाला विरोध करीत असेल त्याला माझा विरोध आहे. तो मग कोणत्याही धर्माचा असो.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पाकला लाल गालिचाच्या घड्या घालून खेळण्यास परवानगी दिली. राजकारणात देशहिताच्या विरोधात काम करणाऱ्यांना जवळ केले जात असेल तर त्यालाही माझा विरोध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Shivsena's opposition to the tour of Pakistan