शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
By Admin | Updated: February 8, 2017 23:23 IST2017-02-08T23:23:27+5:302017-02-08T23:23:27+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कलगीतुरा रंगलेला असतानाच शिवसेनेच्या चार मंत्र्यांनी बुधवारी रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 08 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कलगीतुरा रंगलेला असतानाच शिवसेनेच्या चार मंत्र्यांनी बुधवारी रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
सार्वजनिक बांधकाम आणि उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार आहे की काय, अशी चर्चा यानिमित्त सुरू झाली.