शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
3
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
4
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
5
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
6
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
7
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
8
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
9
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
10
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
11
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
12
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
13
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
14
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
15
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
16
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
17
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
18
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
19
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   

भावाची माया आटली! शिवसेना परळी मतदारसंघातून लढणार निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 4:32 PM

शिवसेनेच्या या घोषणेनंतर परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि सुभाष साबणे यांच्यात तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

मुंबई: गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळी विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत पंकजा मुंडे यांच्याविरोधात उमेदवार न देणाऱ्या शिवसेनेने आता आपली भूमिका बदलली आहे. शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीत याठिकाणी पक्षाचा उमेदवार उभा करायचे ठरवले आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवरून स्थानिक नेत्यांना चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पक्षनिरीक्षक आमदार सुभाष साबणे यांनी परळी आणि आष्टी परिसराचा दौराही केला. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी परळीतून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना परळी विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचा संदेश दिला आहे. यामुळे आपण तयारीला लागावे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. शिवसेनेच्या या घोषणेनंतर परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि सुभाष साबणे यांच्यात तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. याविषयी पंकजा मुंडे यांना विचारले असता, कोणाही निवडणूक लढवावी, मी त्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. जो कोणी असेल त्याला निवडणूक लढवावी लागेल, त्याशिवाय जिंकण्यात मजा नाही. मी मागच्या दाराने आलेले नाही, जनतेतून निवडून आले आहे, असे सांगत पंकजा यांनी धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.परळी हा महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ आहे. धनंजय मुंडे याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपमधून बाहेर पडले होते. तेव्हापासूनच या मतदारसंघात भाऊ-बहिणीत मोठी लढत पाहायला मिळते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर गेल्या निवडणुकीत शिवसेनेने परळी मतदारसंघातून उमेदवार उभा केला नव्हता.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडे