Uddhav Thackeray : "सगळे मंत्री आझाद, पद मिळालं पण जबाबदारी नाही, करा मजा..."; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 07:26 PM2022-08-13T19:26:09+5:302022-08-13T19:40:22+5:30

Shivsena Uddhav Thackeray : "आझादी का अमृत महोत्सव.... मंत्र्यांचं आपलं चाललंय, पदं मिळालीत पण जबाबदारी नाही, करा मजा..., ही अशी सगळी मौज, मजा, मस्ती आहे त्यावर ब्रशचे फटकारे फार मोठं काम करतात."

Shivsena Uddhav Thackeray Slams Eknath Shinde And Devendra Fadnavis Over Cabinet expansion | Uddhav Thackeray : "सगळे मंत्री आझाद, पद मिळालं पण जबाबदारी नाही, करा मजा..."; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

Uddhav Thackeray : "सगळे मंत्री आझाद, पद मिळालं पण जबाबदारी नाही, करा मजा..."; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

googlenewsNext

मुंबई - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. सुरुवातीला मंत्रिमंडळ विस्तार होत नव्हता, तो झाला. पण आता खातेवाटपावरुन घोडं अडलं आहे. यामुळे विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. खातेवाटप झालं नसल्याने राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप सरकारवर होत आहे. असं असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) यांनी खातेवाटपावरून शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला लगावला आहे. "सगळे मंत्री आझाद, पद मिळालं पण जबाबदारी नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मार्मिकच्या वर्धापनदिनी संवाद साधला आहे. 
 
"महागाई आहे, वाढती बेकारी आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे पण महाराष्ट्रातलं सरकार आहे कुठे? काहीही न करता स्वत:चे सत्कार करवून घेतले जात आहे आणि दुसरीकडे अतिवृष्टीने शेतकरी जो बेहाल झाला आहे तिथे जायला मंत्री कुठेत?, मंत्र्यांचं ना खातेवाटप म्हणजे सगळे मंत्री आझाद आहेत, कोणावरतीच काही बंधनं नाहीत. आझादी का अमृत महोत्सव.... मंत्र्यांचं आपलं चाललंय, पदं मिळालीत पण जबाबदारी नाही, करा मजा..., ही अशी सगळी मौज, मजा, मस्ती आहे त्यावर ब्रशचे फटकारे फार मोठं काम करतात" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे यांनी व्यंगचित्रकारांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाच्या आठवणी ताज्या केल्या. हुकूमशाहाला आव्हान देऊन हुकूमशाही नष्ट करण्याची ताकद व्यंगचित्रकारामध्ये असते असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी दिवंगत शिवसेनाप्रमुख आणि व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेली आजच्या काळाशी सुसंगत असलेली काही व्यंगचित्र मुद्दाम दाखवली. उद्धव ठाकरेंनी या व्यंगचित्रांमधून भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तसंच भाजपामध्ये नुकतंच झालेल्या खांदेपालटाच्या मुद्द्याला स्पर्श करत उद्धव ठाकरेंनी बावन असो किंवा मग एकशे बावन्न असो, तुमची कितीही कुळं खाली उतरली तरी शिवसेना संपणार नाही, असं म्हणत भाजपाला जोरदार टोला लगावला. 

अस्वस्थ मनाच्या वेदनेला वाचा फोडण्याचं काम व्यंगचित्रकार करतो. व्यंगचित्रकारांच्या फटकाऱ्यांमधून समाजाला आणि देशाला दिशा मिळत आली आहे. त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेवरही टीका केली. "हर घर तिरंगा लावा, पण ज्यांच्याकडे तिरंगाच नाही तो तिरंगा लावणार कुठे? नुसतं बेंबीच्या देठापासून भारत माता की जय ओरडून चीन मागे जाणार आहे का? घराघरावर तिरंगा लावाच, पण तुमच्या हृदयात देखील तिरंगा हवा", असं उद्धव ठाकरे म्हणाले. हे सांगताना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांनी रेखाटलेलं एक व्यंगचित्र देखील उदाहरणादाखल सादर केलं. व्यंगचित्रात एक मुलगा त्याच्याकडे तिरंगा आहे, पण तो लावण्यासाठी घर नाही असं दाखवण्यात आलं होतं.  

 

Web Title: Shivsena Uddhav Thackeray Slams Eknath Shinde And Devendra Fadnavis Over Cabinet expansion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.