शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray : माशाचे अश्रू दिसत नाहीत; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं मनातलं दुःख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 14:50 IST

Shivsena Uddhav Thackeray : मातोश्रीवर जनतेचे लोढेंच्या लोंढे येत आहेत. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. मी बोलणार आहे, बोलत राहीन, पण सैनिकांच्या मनावर दडपण वाढेल असं बोलणार नाही.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. याच दरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. "आषाढी एकादशी जवळ आली आहे. हजारो जण पंढरपूरला पोहचत आहेत. मलाही निमंत्रण आलं आहे. नंतर मी पंढरपूरल जाईन, दर्शन घेईन. मातोश्रीवर जनतेचे लोढेंच्या लोंढे येत आहेत. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. मी बोलणार आहे, बोलत राहीन, पण सैनिकांच्या मनावर दडपण वाढेल असं बोलणार नाही. हजारो जण पंढरपूरला पोहचत आहेत. मलाही निमंत्रण आलं आहे. नंतर मी पंढरपूरला जाईन, नंतर दर्शन घेईन" असं म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे यांनी यावेळी माशाचे अश्रू दिसत नाहीत असं म्हणत आपल्या मनातलं दुःख व्यक्त केलं आहे. "शिवसेना प्रमुखांना मागे एकदा विचारलं होतं की तुम्हाला वाईट वाटतं की नाही?  त्यावेळी ते म्हणाले होते की माशाचे अश्रू दिसत नाहीत... भावना मलाही आहेत, वाईट मला ही वाटलं. मी आजही बोलेन, उद्याही बोलेने... माझ्या सैनिकांवरचं दडपण कमी करणं हे काम आहे. मला जो त्रास झाला तो कोणाला झाला नसेल" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

"शिवसेनेच्या चिन्हाबद्द्ल सध्या चर्चा सुरू आहे. धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मतदान पत्रिकेवर चिन्हं महत्त्वाचं आहे, पण हे धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची चिन्हं लोकं बघतात, माणूस बघून मतदान करतात. ज्यांना या साध्या माणसांच्या मेहनतीने मोठेपण मिळालं, मोठी झाली ती माणसं गेली... ज्यांनी यांना मोठं केलं ती मोठ्या मनाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं आज ही शिवसेनेसोबत आहेत.." असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

'तुमचं माझ्यावर अजूनही प्रेम...', उद्धव ठाकरेंनी चक्क बंडखोरांचेच मानले आभार; नेमकं काय म्हणाले? 

"आमदार जाऊ शकतो पक्ष जाऊ शकत नाही.. अनेक संभ्रम निर्माण केले जात आहे, जनतेने आणि शिवसैनिकांनी अजिबात या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. जे आमदार माझ्या सोबत राहिले त्यांचे मी जाहीर कौतुक करतो.. काही वाट्टेल ते होवो आम्ही नाही हटणार, या जिगरीची माणसं जिथे असतात तिथेच विजय असतो. शिवसेनेचे काही वाकडं होऊ न देण्याची ताकद आजही शिवसैनिकांच्या मनगटात आहे" असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना