शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
4
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
5
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
6
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
7
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
8
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
9
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
10
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
11
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
12
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
13
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
14
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
15
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
16
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
17
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
18
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
19
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
20
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा

उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारताच अरविंद सावंत खुर्चीवरून उठले; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 16:17 IST

भाजपानं आम्ही हिंदुत्व तोडलं असा आरोप केला. त्याला छेद देणारी आजची घटना आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई - राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत बिकट अवस्था झाली आहे. पक्षाचे ४० आमदार, १२ खासदार शिंदे गटात सहभागी झालेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पक्षसंघटना मजबुत करण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. त्यात अलीकडेच ठाकरेंनी संभाजी बिग्रेडसोबत युतीची घोषणा केली. त्यानंतर आज बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेतील काही लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला. संघ परिवारातील लोकांनी शिवसेनेच्या हिंदुत्ववादी परिवारात प्रवेश केलाय असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. 

मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी भाजपासह शिंदे गटाला निशाणा साधला. या पत्रकार परिषदेत कळमनुरीचे माजी आमदार संतोष टरफे, शेतकरी नेते अजित मगर यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशावेळी मातोश्रीवर मोठी गर्दी होती. पत्रकार परिषदेत बजरंग दलचे नेते उपस्थित होते. तेव्हा उद्धव ठाकरेंनी शेजारील बसलेल्या अरविंद सावंत यांना त्यांना तुम्ही कुठे बसवणार? असा सवाल केला. तेव्हा सावंतांनी मी उठतो असं म्हणत खुर्चीवरून उठून बाजूला गेले हे दृश्य माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाले. 

या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश रोजचं झालंय. मला अभिमान वाटतो की, सत्ताधारी पक्षात पक्षप्रवेशासाठी रांग लागते. परंतु पहिल्यांदाच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसतंय. गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते, गद्दारांना जन्म नाही. याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेकडे येतायेत. भाजपानं आम्ही हिंदुत्व तोडलं असा आरोप केला. त्याला छेद देणारी आजची घटना आहे. त्यात बहुजन, वंचित, मुस्लीम बांधवही शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रातलं हे चित्र देशासाठी मार्गदर्शक ठरेल असं त्यांनी म्हटलं. 

तसेच अनेक विषय आहेत, त्या विषयांवर मी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे. हिंदुत्वाच्या भ्रामक कल्पनेत आपली फरफटत झाली. खरे हिंदुत्व शिवसेनेकडे आहे असं ज्यांना वाटतं त्यांना मातोश्रीचे, शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत. केवळ शिवसेनेला भक्कम करण्यासाठी नव्हे तर शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र, महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व बळकट करण्यासाठी आपण एकत्र यावेत असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. 

दसरा मेळावा शिवतीर्थावरच दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार, तो आमचाच होणार, संभ्रम निर्माण करण्यासाठी कोण काही विधानं करत असेल ते मला माहिती नाही. शिवसैनिकांनी दसरा मेळाव्यास येण्याची तयारी सुरू केली आहे. तांत्रिक, मांत्रिक भाग त्यांचा असेल. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार. शिवसेना, शिवसैनिक ठाम आहे. शिवसेना रस्त्यावर पडलेली वस्तू नाही कुणीही उचलली आणि खिशात टाकावी. शिवसेनेला ५६ वर्ष झाली. ५६ जण पाहिली. शिवसेना निष्ठावंतावर मोठी होतेय. गद्दारांच्या मेहनतीवर नाही. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाArvind Sawantअरविंद सावंत