शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut : "भीती असलीच पाहीजे, हा जनतेचा राग, शिवसेनेची आग"; तोडफोडीवर संजय राऊतांचं रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 14:00 IST

Shivsena Sanjay Raut And Tanaji Sawant : तोडफोडीवर, हिंसाचारावर शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) य़ांनी भीती असलीच पाहीजे असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांच्या बंडानंतर लोकांमध्ये रोष आहे, तो रोखू शकत नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. 

मुंबई - बालाजीनगर येथील आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या मे. भैरवनाथ शुगर वर्क लिमिटेड संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी सुरुवातीला नाम फलकाला काळे फासले, त्यानंतर आमदार तानाजी सावंत गद्दार असल्याच्या घोषणा देत कार्यालयात घुसून टेबल, खुर्च्या आणि काचांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या तोडफोडीवर, हिंसाचारावर शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) य़ांनी भीती असलीच पाहीजे असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांच्या बंडानंतर लोकांमध्ये रोष आहे, तो रोखू शकत नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. 

"हा महाराष्ट्रातील जनतेचा राग आहे, महाराष्ट्रात असं चालत नाही आणि राग हा असलाच पाहिजे. ही शिवसेनेची आग आहे आणि ही आग आम्ही कधीही विझू देणार नाही. राख नाही झाली पाहिजे. अग्नी तेवत ठेवण्यासाठी जी काही समिधा लागेल, ती ओतत राहिली पाहिजे" असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच "तुम्ही आमच्या आमदारांचे अपहरण कराल, त्यांना सुरक्षा द्याल आणि आम्ही आमचा राग काढणार नाही? असं होऊ शकतं का? आम्ही नामर्द आहोत का?, आम्ही नामर्द नाही" असंही म्हटलं आहे. 

"सत्ता आणि बहुमत येत-जात असतं, पक्षावर कब्जा केलात तर तलवारीला उत्तर तलवारीने देऊ" 

जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल. सत्ता आणि बहुमत येत-जात असतं. ठाकरे या नावाशी खरी शिवसेना जोडलेली असल्याचं संजय राऊत म्हणाले. यासोबतच शिंदे, राणे, भुजबळ हे लोक येत राहतात आणि येत राहतील. आम्ही बाळासाहेबांचे भक्त आहोत असं कोणी म्हणत असेल तर भक्ती करा. पक्षावर कब्जा करू नका, जर कब्जा केलात तर तलवारीला उत्तर तलवारीने देऊ असं राऊत यांनी म्हटलं आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे. राज्यातील आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. 

शिवसैनिक अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. असे असताना  दक्षिण उपनगरातील शिवसैनिकामध्ये असलेला असंतोष आज उफाळून आला आणि पहिल्यापासून पक्षात नाराज असलेल्या आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.एकनाथ शिंदे आणि पक्षात फुट पाडण्यात आमदार तानाजी सावंत जबाबदार असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. माजी नगरसेवक विशाल धनावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कुलाण धनावडे, सुनिल पायगुडे, परेश खडके व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाTanaji Sawantतानाजी सावंतEknath Shindeएकनाथ शिंदे