शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

"मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थाने करुन राज्य चालवता येणार नाही"- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 14:25 IST

"आज जे लोक किरकिर करता आहेत, ते उद्या शिवसेनेच्या पायाशी दिसतील. अंगावर आलात, तर फक्त शिंगावर घेणार नाही, तर तुडवले जाल."

मुंबई: आज शिवसेनेचा 56वा वर्धापणदिन आहे. यानिमित्त मुंबईत मोठा कार्यक्रम होत आहे. यावेळी शिवसेने नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ''मी काही दिवसांपूर्वी एक विधान केले होते, त्यावर भाजपने टीका केली होती. श्रीलंकेत जनता रस्त्यावर उतरली, तेव्हा भारतातील परिस्थिती अशीच व्हायला वेळ लागणार नाही, असं मी म्हणालो होतो.'' 

'तरुणांसमोर सैन्याचा वापर'"त्याच्या एका महिन्याच्या आत देशातील परिस्थिती तशीच झाली आहे. तरुणांना रोखण्यासाठी सैन्य मागवावे लागले. बिहारमध्ये सैन्य आले, याला राज्य चालणे म्हणत नाहीत. राज्य चालवणे पाहायचे असेल, तर मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थाने करुन राज्य चालवता येणार नाही. राज्य सगळ्यांना एकत्र घेऊन चालवावे लागेल. ती क्षमता शिवसेनेकडे आहे.'

संबंधित बातमी- 'तेरा घमंड चार दिन का है पगले...', संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

'शिवेसनेच्या अंगावर किरोकोळ लोक सोडले''शिवसेनेचा 56 वर्षांचा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगता इतिहास आहे. अन्यायाविरोधात ठिणगी टाकण्याचे काम 56 वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी केले, आजही न्यायाच्या लढाईत सर्वात पुढे शिवसेनाच आहे. शिवेसनेच्या अंगावर किरोकोळ लोक खूप सोडले, राणा-बाणा-काणा. पण शिवसेनेचा बाणा, स्वाभिमानाचा बाणा, राष्ट्रीय बाणा, मराठी बाणा, अन्यायाविरोधात लढण्याचा बाणा, हा सगळ्यांच्या छाताडावर पाय ठेवून उभा आहे."

'अंगावर आलात तर...'"आज जे लोक किरकिर करता आहेत, ते उद्या शिवसेनेच्या पायाशी दिसतील. केंद्रीय यंत्रणेची मस्ती आम्हाला दाखवली. सीबीआय, इडी, इनकम टॅक्स मागे लावले. पण, आम्ही कोणाला भीत नाही. अंगावर आलात, तर फक्त शिंगावर घेणार नाही, तर तुडवले जाल, असा इशाराही राऊतांनी दिला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा