शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

Sanjay Raut in jail: सुनील राऊत आणि अनिल देसाईंना रोखले; संजय राऊतांना भेटण्यास तुरुंग प्रशासनाची स्पष्ट मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:04 IST

आमदार सुनील राऊत आणि खासदार अनिल देसाई यांना तुरुंग प्रशासनाने संजय राऊतांना भेटू दिले नाही.

मुंबईः शिवसेना नेते संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये त्यांचा मुक्काम असेल. दरम्यान, कोणत्याच व्यक्तीला संजय राऊत (Sanjay Raut) यांना भेटू दिले जात नाहीये. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut) यांनाही तुरुंग प्रशासनाने भेटीची परवानगी नाकारली. 

आज सकाळी संजय राऊत यांचे धाकटे बंधू आणि शिवसेना आमदार सुनील राऊत खासदार अनिल देसाईसह संजय राऊत यांना भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात गेले होते. मात्र तुरुंग प्रशासाने त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिली. न्यायालयाकडून रीतसर परवानगी आणल्यानंतरच संजय राऊतांना भेटू दिले जाईल, असे कारागृह प्रशासनाने सांगितले. संजय राऊत यांच्यावर पत्रावाला चाळ प्रकरणात ही कारवाई झाली आहे. 

काय म्हणाले सुनील राऊत?तुरुंग प्रशासनाने भेट नाकारल्यानंतर सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'आमची कोर्टात लढाई सुरू आहे. वकिलांशी भेटून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. ते काहीही करू शकतात. सज्जन माणसाला अडकवू शकतात, चांगल्या माणसाची जिंदगी बरबाद करू शकतात. त्यांच्याकडून याच अपेक्षा आहे. सत्य परेशान हो सकता है..पर पराजित नही. एक वरची शक्ती काम करत असते, त्यामुळे हे चाललंय. एक दिवस सगळं उलटं फिरेल', असा इशारा सुनील राऊत यांनी यावेळी दिला.

जामीन कधी मिळणार ?पत्रावाला चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. 08 ऑगस्ट रोजी त्यांची ईडी कोठडी संपली. त्यानंतर त्यांना कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत म्हणजेच आणखी 12 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवले जाईल. दरम्यान शिवसेना नेते आणि राऊतांचे बंधू सुनील राऊत हे संजय राऊतांच्या जामीनासाठी प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाArthur Road Jailआर्थररोड कारागृहEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय