शिवसेनेला हिंदी समजत नाही

By Admin | Updated: June 18, 2016 22:18 IST2016-06-18T22:18:28+5:302016-06-18T22:18:28+5:30

मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे, अशी शिवसेना-मनसेची भूमिका आहे. परंतु हिंदी भाषिकांची अनेक राज्ये आहेत. विदर्भातील भाषा मराठी-हिंदी आहे. शिवसेनेला हिंदी भाषा नसल्याने

Shivsena does not understand Hindi | शिवसेनेला हिंदी समजत नाही

शिवसेनेला हिंदी समजत नाही

श्रीहरी अणे यांचा आरोप : शेतकऱ्यांच्या मदतीपेक्षा मेट्रो महत्त्वाची वाटते

नागपूर : मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे, अशी शिवसेना-मनसेची भूमिका आहे. परंतु हिंदी भाषिकांची अनेक राज्ये आहेत. विदर्भातील भाषा मराठी-हिंदी आहे. शिवसेनेला हिंदी भाषा नसल्याने शिवसेना संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप विदर्भवादी नेते व राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी शनिवारी केला. राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीतर्फे जय जलाराम मंगल कार्यालयात आोयोजित वेगळ्या विदर्भ राज्यासाठीच्या जाहीर सभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर ‘व्हीकॅन’चे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ, जनसुराज्यचे अध्यक्ष राजेश काकडे, विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. स्वप्नील संन्याल, प्रकाश निमजे, चंद्रभान रामटेके, महिला शहराध्यक्ष ज्योती गांधी, शहराध्यक्ष हरेश निमजे, योगीराज वाहने आदी उपस्थित होते.
शिवसेना-मनसेची भूमिका मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे, अशी आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याला ६० वर्षापूर्वीच उत्तर दिले आहे. ही कल्पनाच चुकीची असून विदर्र्भातील लोकांना मराठी इतकीच हिंदी भाषा सोपी वाटते. शिवसेनेचे म्हणणे विचारात घेतले तर त्यांना इतिहास माहीत नसल्याचे दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य व त्यानंतर पेशव्याचे राज्य देशाच्या ६० टक्के भूभागावर होते. त्यामुळे मराठी माणसाचे एक राज्य ही कल्पनाच चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यापूर्वीची विदर्भाची मागणी आहे. लोकनायक बापूजी अणे यांनी सी.पी.अँड बेरार राज्य बरखास्त करू नका, अशी भूमिका मांडली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही विदर्भासह छोट्या संघ राज्याचे समर्थन केले होते. त्यांनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व मुंबई (केंद्रशासित) राज्ये व्हावे, अशी भूमिका मांडली होती. संयुक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी हुतात्मे झाले होते. तसेच स्वंतत्र विदर्भासाठीही हुतात्मे झाले असल्याचे अणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी )

Web Title: Shivsena does not understand Hindi